india vs pakistan match  Saam tv
Sports

Ind Vs Pak : आधी टेन्शन वाढवलं, नंतर टीम इंडियानं डाव सावरला, पाकिस्तानकडून भारताला इतक्या धावांचं आव्हान

india vs pakistan match : पाकिस्तानने भारताला १७२ धावांचं आव्हान दिलं आहे. पाकिस्ताने आधी टेन्शन वाढवलं, पण नंतर टीम इंडियानं डाव सावरल्याचं पाहायला मिळालं.

Vishal Gangurde

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गडी गमावून १७२ धावा कुटल्या

साहिबजादा फरहानने आक्रमक फलंदाजी केली, त्याने ५८ धावा कुटल्या

भारतासाठी शिवम दुबेने २, तर हार्दिक आणि कुलदीपने प्रत्येकी १ गडी बाद केले

भारताला मॅच जिंकण्यासाठी १७३ धावांचं आव्हान

india vs pakistan match : भारत आणि पाकिस्तानमध्ये आशिया कपचा सुपर ४ सामना सुरु आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २० षटकात ५ गडी गमावून १७२ धावांचं आव्हान दिलं. पाकिस्तानसाठी साहिबजादा फरहानने सर्वाधिक ५८ धावा कुटल्या. भारतासाठी शिवम दुबेने दोन तर हार्दिक-कुलदीपने प्रत्येकी १-१ विकेट घेतले.

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला तिसऱ्या षटकात पहिला झटका बसला. फखर जमां ९ चेंडूत १५ धावा करून बाद झाला. हार्दिक पंड्याने फखर जमांला बाद केलं. सईम १७ चेंडूत २१ धावा करुन बाद झाला.

अयूब आणि फरहानने दुसऱ्या विकेटसाठी ४९ चेंडूत ७२ धावांची भागिदारी रचली. हुसैन तलतने १० धावा करून कुलदीपच्या चेंडूवर बाद झाला. फरहान ४५ चेंडूत ५८ धावा करून बाद झाला. फरहानने पाकिस्ताननसाठी सर्वाधिक धावा कुटल्या. सलमान आगाने १३ चेंडूत १७ धावा आणि फहीम ८ चेंडूत २० धावा करून नाबाद राहिले .

टीम इंडियाकडून शिवम दुबेने चांगली गोंलदाजी केली. शिवमने ४ षटकात ३३ धावा देऊन २ गडी बाद केले. कुलदीप आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी १-१ गडी बाद केले. आता पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा टीम इंडिया कसा सामना करते, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanteras 2025: धनत्रयोदशीचा दिवस बनवा शुभ! करा 'या' शुभ कामांचा आरंभ, टाळा 'या' चुका

Maharashtra Live News Update: खेडशिवापूर टोलनाक्याजवळ कंटेनरला लागली आग

Amitabh Bachchan: 'मला नियम समजावू नका...'; १० वर्षाच्या मुलाने अमिताभ बच्चन यांचा केला अपमान

Diwali Good Luck: दिवाळीत करा हे ५ सोपे वास्तु उपाय, सुख - समृद्धीसह, लक्ष्मी येईल घरात

Bhaubeej Gift : यंदाची भाऊबीज कायम राहील लक्षात, भावंडांना द्या टेक-फ्रेंडली गिफ्ट्स

SCROLL FOR NEXT