T20 world cup 2026 final prize money breakdown SAAM TV
Sports

T20 world cup prize money: T20 वर्ल्ड कप विजेत्या टीमवर कोटींचा वर्षाव; उपविजेत्यालाही मिळणार मोठी रक्कम

T20 world cup 2026 final prize money breakdown: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी२० वर्ल्डकप २०२६ ची फायनल होणार आहे. विजेत्या टीमला तब्बल ₹२७.५० कोटींचं बक्षीस मिळणार असून आयसीसीने एकूण १३.५ दशलक्ष डॉलर्सचा प्राईज पूल जाहीर केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आयसीसी मेन्स टी२० वर्ल्डकपच्या २०२६ चा अंतिम सामना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीम्स सामन्यात एकमेकांसमोर येणार आहेत. पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सने पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा ७ रन्सने पराभव करून फायनलं तिकीट मिळवलं. यावेळी टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा टी२० वर्ल्डकप जिंकण्याचं लक्ष्य ठेवणार आहे. तर न्यूझीलंडने आतापर्यंत टी२० वर्ल्डकप जिंकलेला नाही.

फायनल सामन्यानंतर विजेत्या आणि उपविजेत्या टीम्सना मोठ्या प्रमाणात प्राईज मनी मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टी२० वर्ल्डकप २०२६ च्या विजेत्या टीमला ३ दशलक्ष डॉलर्स म्हणजे अंदाजे २७.५० कोटी रुपये मिळणार आहेत. याशिवाय पराभूत टीमला म्हणजेच टीमला १.६ दशलक्ष डॉलर्स मिळणार आहेत.

सेमीफायनल गमावलेल्या टीमही

सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका टीम्सना समान रक्कम $0.79 दशलक्ष (अंदाजे रु. 7.24 कोटी) मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सर्व टीम्सना फायदा व्हावा म्हणून वेगवेगळ्या टप्प्यांनुसार रकमेची विभागणी केली आहे. पाचव्या ते बाराव्या क्रमांकावर असलेल्या टीम्सना समान रक्कम $0.38 दशलक्ष (अंदाजे रु. 3.48 कोटी) मिळणार आहे. १३व्या ते २०व्या क्रमांकावर असलेल्या टीम्सना समान रक्कम $0.25 दशलक्ष (अंदाजे रु. 2.29 कोटी) मिळतील.

आयसीसीने एकूण प्राईज मनी १३.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे अंदाजे १२३.७७ कोटी रुपये दिलीये. ही रक्कम २०२४ च्या टी-२० वर्ल्डकपेक्षा सुमारे २० टक्के जास्त आहे. गेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये आयसीसीने ११.२५ दशलक्ष डॉलर्स दिले होते. विजेत्या भारतीय टीमला २.४५ दशलक्ष डॉलर्स मिळालेत. उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला १.२८ दशलक्ष डॉलर्स मिळाले.

२०२६ च्या टी२० वर्ल्डकपमधील प्राईज मनी रक्कम

  • विजेता: अंदाजे ₹२७.५० कोटी

  • रनर अप: अंदाजे ₹१४.६७ कोटी

  • सेमीफायनल मधील पराभूत टीम: अंदाजे ₹७.२४ कोटी

  • पाचव्या ते बाराव्या क्रमांकावर असलेल्या टीम: अंदाजे ₹३.४८ कोटी

  • १३व्या ते २०व्या क्रमांकावर असलेल्या टीम: अंदाजे ₹२.२९ कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Womens Day स्पेशल बायकोला द्या स्वस्तात मस्त गिफ्ट, वाढेल नात्यातलं प्रेम

Maharashtra Live News Update : इस्रायल- इराण युद्धाचा फटका, हॉटेलमधील जेवण आणि मद्यसेवन महागणार

Women's Day Gifts: वूमन्स डे निमित्त स्वतःला द्या हे ७ खास गिफ्ट्स; दिवस होईल अधिक स्पेशल

Moong Dishes : मुगापासून झटपट करा 'हे' ६ पौष्टिक पदार्थ; मुलंही आवडीने खातील

LPG Gas Price: १ किलो एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत किती?

SCROLL FOR NEXT