India Vs New Zealand Match Saam Tv
Sports

India Vs New Zealand: टीम इंडियानं मालिका जिंकली; भारतीय गोलंदाजांची शानदार कामगिरी, किवीचा संघ 187 धावांवर ऑल आऊट

India Vs New Zealand Match Live Update: भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताने जबरदस्त कामगिरी केली. ही मालिका भारताने ३-१ ने जिंकली. शेवटचा सामाना भारतीय संघाने २२ धावांनी जिंकला.

Priya More

माउंट माउंगानुई येथे झालेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा २२ धावांनी पराभव केला. भारताने ही मालिका ३-१ ने जिंकली. पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना शरणागती पत्करायला भाग पाडले. भारताच्या सर्व वेगवान गोलंदाजांनी मैदानावर धुमाकूळ घालत न्यूझीलंडच्या फलंदाजांना त्यांच्याच भूमीवर दारुण पराभव केला.

भारतीय संघाच्या अर्शदीप सिंगने सर्वाधिक तीन बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. अकीब नबी, यश ठाकूर आणि नमन धीर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. भारताने न्यूझीलंडसमोर २१० धावांचे लक्ष्य ठेवले. ज्यानंतर न्यूझीलंडचा संघ केवळ १८७ धावाच करू शकला. भारतीय संघाने पाचवा एकदिवसीय सामना २२ धावांनी जिंकला. न्यूझीलंड संघाचा खेळाडू डीन फॉक्सक्रॉफ्टने सर्वाधिक ३१ धावा केल्या.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची वनडे मालिकेचा शेवट खबूच रोमांचक झाला. पाचवा एकदिवशीय सामना जिंकून भारतीय संघाने ३-१ ने ही मालिका आपल्या नावावर केली. न्यूझिलंडमध्ये सात वर्षांनंतर भारताने मिळवलेला हा पहिला एकदिवशीय मालिकांमधील विजय आहे. भारतीय संघाने शेवटची एकदिवशीय मालिका २०१९ मध्ये ४-१ ने जिंकली होती. तब्बल सात वर्षांनंतर भारतीय संघाने पुन्हा एकदिवशीय मालिका जिंकल्यानंतर सर्व खेळाडूंनी आणि क्रिकेटप्रेमींनी जल्लोष केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! दोन पिस्तूल, १९ काडतुसे अन् बिश्नोई गँग...; लांडगे कुटुंबीयांनी काय सांगितलं?

Hair Care: केसगळती होईल कमी, केस होतील दाट आणि मजबूत! घरीच बनवा हा खास प्रोटीन हेअर मास्क

Devendra Fadnavis : माओवादमुक्त गडचिरोली आता देशाचं आर्थिक इंजिन बनवणार, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

कंगवा किती दिवसांनी स्वच्छ करायचा? जाणून घ्या योग्य वेळ

SCROLL FOR NEXT