Ind Vs NZ 3rd T20 Match
Ind Vs NZ 3rd T20 Match Saamtv
क्रीडा | IPL

Ind Vs NZ T20 Series: जिंकलस भावा! विजयानंतर पांड्याची 'ती' कृती, संघाबाहेर बसलेला पृथ्वी शॉ झाला थक्क; Videl Viral

Gangappa Pujari

Ind Vs NZ 3rd T20: न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. या विजयासोबतच भारतीय संघाने तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिकाही खिशात घातली. कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेपाठोपाठ टी ट्वेंटीमध्येही धुळ चारली.

मालिका जिंकल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) एका कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामुळे पांड्याचे कौतुकही होत आहे.

भारत आणि न्यूझीलंडचा शेवटचा टी ट्वेंटी सामना काल खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात शुभमन गिलने वादळी शतकी खेळी केली. यामुळेच न्यूझीलंडसमोर भारतीय संघाने २३४ धावांचा डोंगर उभा केला.

या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव अवघ्या ६६ धावांमध्ये आटोपला. यामुळेच हा सामना भारतीय संघाने तब्बल १६८ धावांनी जिंकला.

काय म्हणाला हार्दिक..

सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने आयुष्य आणि कॅप्टनशिपबद्दल माझा खूप साधा, सोपा नियम आहे. मी खाली गेलो, तर माझ्या निर्णयाने जाईन. मी माझे निर्णय स्वत: घेतो. मला जबाबदारी घ्यायला आवडते. प्रेशर असलेले सामने नॉर्मल पद्धतीने, कुठलाही दबाव न घेता खेळायचे आहेत. मोठ्या स्टेजवर अजून चांगली कामगिरी करु, अशी प्रतिक्रिया दिली.

त्या कृतीने वेधले लक्ष...

सामना जिंकल्यानंतर हार्दिकच्या एका कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले. यावेळी हार्दिकने विजयाची ट्रॉफी थेट पृथ्वी शॉच्या हातात नेवून दिली. त्याच्या या कृतीने सर्वांनाच धक्का बसला. कारण पृथ्वी शॉला संघाबाहेर ठेवल्याने हार्दिकवर जोरदार टीकाही झाली होती. शॉला संघात संधी दिली जाईल असे वाटत होते. मात्र त्याला संपूर्ण मालिकेत बाहेर बसावे लागले. सध्या हार्दिकच्या या कृतीचे कौतुक केले जात आहे.

हा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Viral Video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

SCROLL FOR NEXT