ind vs nz twitter
Sports

IND vs NZ 2nd Test: न्यूझीलंडचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; KL Rahul बाहेर, प्लेइंग 11 मध्ये 3 मोठे बदल

IND vs NZ, Team India Playing XI: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे.

Ankush Dhavre

भारत आणि न्यझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु आहे. भारतीय संघ या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे.

त्यामुळे मालिकेत कमबॅक करण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

खेळपट्टी कोणाला देणार साथ?

हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु आहे. मालिकेतील पहिला सामनात बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर पार पडला होता. या खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळाली होती. मात्र वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे. ही खेळपट्टी बनवण्यासाठी काळ्या मातीचा वापर केला गेला आहे. त्यामुळे ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरु शकते. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांची जादू पाहायला मिळू शकते.

भारतीय संघात ३ बदल

या सामन्यासाठी भारतीय संघात ३ मोठे बदल करण्यात आले आहेत. गेल्या सामन्यात शुभमन गिलला संधी दिली गेली नव्हती. त्याला दुखापतीमुळे प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवलं गेलं होतं. त्याच्या जागी सरफराज खानला संधी दिली गेली होती. सरफराजला दुसऱ्या सामन्यासाठीही संधी दिली गेली आहे. तर केएल राहुलला बाहेर बसवलं आहे. यासह कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराजलाही विश्रांती देण्यात आली आहे. या दोघांच्या जागी वॉशिंग्टन सुंदर आणि आकाश दीपला संधी दिली गेली आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत ( यष्टीरक्षक), सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, रविंद्र जडेजा, आर अश्विन

न्यूझीलंड - टॉम लाथम (कर्णधार), डेव्हन कॉनवे, विल यंग, रचिन रविंद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साऊदी, एजाज पटेल, विलियम ओ'रूर्क

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाना भानगिरे यांनी लुटला प्रचारादरम्यान क्रिकेट खेळण्याचा आनंद

Red Chilli Thecha Recipe: महिनाभर टिकेल असा लाल मिरच्यांचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा? वाचा रेसिपी अन् काही टिप्स

Women Investment Tips: कमी गुंतवणूक अन् जास्त फायदा, महिलांसाठी पैसे गुंतवणूकीच्या या 5 बेस्ट स्कीम

Viral Video : बेफाम दारू प्यायला अन् बार गर्लवर पैसे उधळले; नवी मुंबईतील पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar : राजकीय दबावामुळे अधिकार्‍यांचे राजीनामे, अजित पवार स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT