mitchell santner  twitter
Sports

IND vs NZ 2nd Test: सँटनरची 'सुंदर' गोलंदाजी! 7 विकेट्स घेत टीम इंडियाला केलं All Out; न्यूझीलंडकडे मोठी आघाडी

India vs New Zealand 2nd Test, Day 2: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा डाव १५९ धावांवर आटोपला आहे.

Ankush Dhavre

India vs New Zealand 2nd Test: पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांनी चांगलीच फिरकी घेतली. भारतीय संघाचा फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना दमदार रेकॉर्ड राहिला आहे.

मात्र या डावात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना चांगलाच घाम फोडला. भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या १५६ धावांवर संपुष्ठात आला आहे. यासह न्यूझीलंडने पहिल्या डावात १०३ धावांची आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाला या सामन्यातील पहिल्याच दिवशी फलंदाजी करण्याची संधी मिळाली. मात्र शेवटचे काही षटक शिल्लक असताना कर्णधार रोहित शर्मा शून्यावर माघारी परतला. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय संघाला एका पाठोपाठ एक मोठे धक्के बसले.

शुभमन गिल ३० धावा करत माघारी परतला. त्यानंतर विराट कोहली १ धाव करत माघारी परतला. यशस्वी जयस्वाललाही चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र तो ३० धावा करत माघारी परतला. सुरुवातीला मोठे धक्के बसल्यानंतर रिषभ पंत १८, सरफराज खान ११, रविंद्र जडेजा ३८, आर अश्विन , आकाश दीप ७, जसप्रीत बुमराह ० धावांवर माघारी परतला. तर वॉशिंग्टन सुंदर १८ धावांवर नाबाद राहिला.

न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना मिचेल सँटनर चमकला. त्याने या डावात १९.३ षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने ५३ धावा खर्च करत ७ गडी बाद केले. ग्लेन फिलिप्सने २६ धावा खर्च करत २ आणि टीम साऊदीने १८ धावा खर्च करत १ गडी बाद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT