IND VS ENG saam tv
Sports

IND vs ENG ODI Series Schedule: टी-२० नंतर आता वनडेचा थरार रंगणार! केव्हा, कधी अन् कुठे रंगणार सामने? पाहा वेळापत्रक

India vs England ODI Series Schedule And Timetable: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. ही मालिका झाल्यानंतर आता दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार रंगणार आहे.

Ankush Dhavre

इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली.

यासह मालिका ४-१ ने खिशात घातली. टी -२० मालिका झाल्यानंतर आता दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार रंगणार आहे. दरम्यान या मालिकेला केव्हा सुरुवात होणार? जाणून घ्या.

केव्हा होणार सुरुवात?

दोन्ही संघांमध्ये झालेल्या टी -२० मालिकेत युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला. आता संघातील अनुभवी खेळाडू आपला जलवा दाखवताना दिसून येणार आहेत. दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या वनडे मालिकेला ६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या मैदानावर रंगणार आहे. तर मालिकेतील दुसरा सामना ९ फेब्रुवारीला कटकमध्ये रंगणार आहे. तर मालिकेतील अंतिम वनडे सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. ही मालिका चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे.

असं आहे मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक

पहिला वनडे सामना -६ फेब्रुवारी, नागपूर.

दुसरा वनडे सामना - ९ फेब्रुवारी, कटक

तिसरा वनडे सामना -१२ फेब्रुवारी, अहमदाबाद

कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

वनडे मालिकेतील रेकॉर्ड पाहिला तर भारतीय संघाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. गेल्या ६ मालिकांमध्ये इंग्लंडला एकही मालिका जिंकता आलेली नाही. यापूर्वी २०१८ मध्ये झालेल्या वनडे मालिकेत इंग्लंडने भारतीय संघाचा पराभव केला होता. त्यानंतर पुढील दोन्ही वनडे मालिकांमध्ये भारतीय संघाने इंग्लंडला धूळ चारली आहे. आता ही मालिका जिंकून भारतीय संघ विजयाची हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ऑलिंपिक महासचिव नामदेव शिरगावकर यांच्यावर गुन्हा दाखल

Satara News : डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणातील आरोपी बदने आणि बनकरचा एकमेकांशी संबंध काय? कोर्टात काय युक्तिवाद झाला?

Aadhaar Card Rules Change: आधार कार्डबाबत मोठी अपडेट; कार्ड बनवण्यापासून ते अपडेटपर्यंतच्या नियमांमध्ये अनेक बदल

Heart Attack: छातीतील जळजळ फक्त अ‍ॅसिडिटी नव्हे, हार्ट अटॅकचाही असू शकतो धोका; ही 4 लक्षणे दुर्लक्ष करू नका

India Playing 11 Prediction : भारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी २० मॅच कधी, कुठे आणि कशी असेल संभाव्य प्लेइंग ११?

SCROLL FOR NEXT