Team India Playing 11 saam tv
Sports

Ind Vs Eng : वैभव सूर्यवंशी, इशान किशन की तिलक वर्मा... कोणाला देणार डच्चू? इंग्लंडविरुद्ध संघात संजू सॅमसनची पुन्हा होणार एन्ट्री

India Playing XI 5th T20 : साउथैम्प्टनमध्ये पाचव्या टी २० सामना होणार असून, भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुन्हा बदल होणार आहे. संजू सॅमसनची संघात एन्ट्री होण्याची शक्यता असून, तिघांपैकी एका खेळाडूला बाकावर बसावं लागणार आहे. ते कोण हे जाणून घेऊयात.

Nandkumar Joshi

India Vs England 5th T20 : आयर्लंडनंतर भारतीय संघाची विस्कळीत झालेली घडी इंग्लंडविरुद्धच्या टी २० मालिकेतही व्यवस्थित बसलेली नाही. संघात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली असून, प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येक सामन्यात बदल करावा लागत आहे. परिणामी संघाला पराभवाचा सामना करावा लागत आहे. आता इंग्लंडविरुद्धच्या सलग तीन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागलेल्या भारतीय संघात पाचव्या टी २० सामन्यातही बदल होण्याची शक्यता आहे. चॅम्पियन संजू सॅमसनची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. तर त्याला संघात मिळाला तर, वैभव सूर्यवंशी, इशान किशन किंवा तिलक वर्मा यापैकी एकाला बाकावर बसावे लागू शकते.

इंग्लंडविरुद्धचा पाचवा आणि अखेरचा टी २० सामना साउथैम्प्टनमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने आधीच ही मालिका गमावली आहे. अखेरचा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला पूर्ण ताकदीनीशी खेळ करावा लागणार आहे. त्यामुळे प्लेइंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसनला कमबॅक करण्याची संधी आहे. तर संजू सॅमसन कुणाची जागा घेणार? सलामीवर वैभव सूर्यवंशी, इशान किशन की तिलक वर्मा ? या तिघांपैकी एकाला निश्चितच बाहेर बसावे लागणार आहे.

वैभव सूर्यवंशी ठरतोय अपयशी, पण संधी मिळाली पाहिजे

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला इंग्लंडविरुद्धच्या टी २० मालिकेत आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. पण पहिल्या ३ सामन्यांत त्याला प्रभाव पाडता आला नाही. त्याच्याकडून एकही मोठी खेळी झाली नाही. दोन सामन्यांत जोफ्रा आर्चरनं त्याची कमकुवत बाजू हेरली आणि त्याला बाद केले. ३ डावांत त्याला फक्त ४२ धावाच करता आल्या. पण माजी खेळाडूंच्या मते त्याला अजून संधी मिळाली पाहिजे.

इशान किशन आणि तिलक वर्माची कामगिरी

इशान किशनची बॅटही अद्याप तळपलेली नाही. त्याने चार डावांमध्ये केवळ ६६ धावाच केल्या. तर संघाचा उपकर्णधार तिलक वर्मालाही जादुई खेळी करता आलेली नाही. त्याने चार सामन्यांत फक्त ५१ धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात टीम इंडियाचं वर्चस्व पणाला लागणार आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन काही कठोर निर्णय घेऊ शकते. संजू सॅमसन पाचव्या सामन्यात खेळू शकतो. त्याला वैभव सूर्यवंशी, इशान किशन किंवा तिलक वर्मा यांच्यापैकी एकाला वगळून प्लेइंग ११ मध्ये संधी मिळू शकते.

सॅमसनसह या खेळाडूलाही मिळू शकते संधी

सॅमसनचं कमबॅक होऊ शकतं, तसंच टी २० प्लेइंग इलेव्हनमध्ये आणखी एका युवा खेळाडूला संधी दिली जाऊ शकते. ऑलराउंडर सूर्यांश शेडगेला संघात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवम दुबेऐवजी तो संघात दिसू शकतो.

संभाव्य प्लेइंग ११ (india vs england 5th t20 sanju samson playing xi)

अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन किंवा संजू सॅमसन, तिलक वर्मा, श्रेयस अय्यर, शिवम दुबे किंवा सूर्यांश शेडगे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, प्रसिद्ध कृष्णा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: DCM सुनेत्रा पवारांची बैठक सुरू असतानाच विभागीय वन अधिकाऱ्याला ४५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक

Water Intake: वय, वजन आणि ऋतूनुसार बदलते पाण्याची गरज; जाणून घ्या दिवसभरात किती पाणी प्यावं?

Saturday Horoscope : मनात राग ठेवू नका, ७ राशींच्या व्यक्तींची होणार चांदी; वाचा शनिवारचे राशीभविष्य

PM-किसान योजनेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय! 9 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना होणार फायदा

Fruits at night: रात्रीच्या वेळेस कोणती फळं खाऊ नयेत?

SCROLL FOR NEXT