india vs england 4th test playing 11 prediction akash deep may get chance to debut cricket news marathi twitter
Sports

IND vs ENG, Team India Playing XI: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११; बुमराहच्या जागी कोण?

India vs England 4th Test: मालिकेतील तिसरा सामना जिंकून भारतीय संघाने कसोटी मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील चौथा सामना जिंकून भारतीय संघ ही मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

Ankush Dhavre

India vs England 4th Test, Team India Playing XI:

भारतीय संघाने इंग्लंडच्या खेळाडूंचा चांगलाचा पाहुणचार केला आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ३ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी इंग्लंडच्या बॅझबॉलची चांगलीच हवा काढली आहे. मालिकेतील तिसरा सामना जिंकून भारतीय संघाने कसोटी मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील चौथा सामना जिंकून भारतीय संघ ही मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

प्लेइंग ११ मध्ये होणार बदल..

या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतो. चौथ्या कसोटीतून केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह बाहेर पडले आहेत. केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. तर जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहच्या जागी मुकेश कुमारला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. तसेच आकाश दीपला देखील पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते. (Cricket news in marathi)

भारताचा युवा स्टार आकाश दीपने इंडिया एकडून खेळताना दमदार कामगिरी केली आहे. त्याने इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध खेळताना २ सामन्यांमध्ये १० गडी बाद केले होते. त्याची ही कामगिरी पाहता त्याला बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाती संभावित प्लेइंग ११:

यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रविंद्र जड़ेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप, मोहम्मद सिराज

चौथ्या कसोटीसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : दहा वर्षे केंद्रात कृषीमंत्री, सहकारासाठी योगदान काय? विखे पाटलांची नाव न घेता शरद पवारांवर टीका

Nag Panchami 2025 : नाग पंचमीच्या तारखेपासून ते पूजेची पद्धत सर्व माहिती घ्या जाणून

Maharashtra Live News Update: युरिया टंचाईमुळे शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

Nashik Honey Trap : नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढली; ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टर्स, व्यावसायिक अडकले

SCROLL FOR NEXT