इंग्लंडचा संघ ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात बदल करण्यात आले आहेत. (IND vs ENG 3rd Test)
भारतीय संघात बदल..
या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल करण्यात आले आहेत. दुसऱ्या कसोटीतून बाहेर असलेला रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज या सामन्यात कमबॅक करताना दिसून येणार आहे. तर युवा खेळाडू सरफराज खान आणि यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला कसोटी पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. संधीचं सोनं करण्यात अपयशी ठरलेल्या केएस भरतला या सामन्यातून डच्चू देण्यात आला आहे. तर मोहम्मद सिराजच्या कमबॅकनंतर मुकेश कुमारला विश्रांती देण्यात आली आहे. तर रविंद्र जडेजाच्या कमबॅकनंतर अक्षर पटेलला प्लेइंग ११ मधून बाहेर करण्यात आलं आहे. (Cricket news in marathi)
या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:
यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
या सामन्यासाठी अशी आहे इंग्लंडची प्लेइंग ११:
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टिरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.