India vs England rohit Sharma and Jasprit Bumrah Shikhar Dhawan/BCCI SAAM TV
क्रीडा

India vs England: टीम इंडिया जिंकली रे... इंग्लंडला पहिल्याच वनडेमध्ये लोळवलं

टीम इंडियानं पहिल्याच एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा दारूण पराभव केला. पाहा संपूर्ण स्कोअरकार्ड

Nandkumar Joshi

मुंबई: गोलंदाजांची धमाल आणि त्यानंतर सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी केलेली कमाल यामुळं टीम इंडियानं पहिल्याच वनडेमध्ये इंग्लंडच्या संघाचा दारूण पराभव केला. टीम इंडियानं या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. सहा विकेट घेणारा जसप्रीत बुमराह सामनावीराचा मानकरी ठरला. (India 10 Wicket Win Over England in 1st ODI)

भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामी यांनी जबरदस्त स्पेल टाकला. बुमराहने इंग्लंडच्या फलंदाजांना फार वेळ मैदानात तग धरू दिला नाही. त्याला शामीनं चांगली साथ दिली. बुमराहने ६ फलंदाज बाद केले. इंग्लंडला अवघ्या ११० धावांवर रोखले. (India vs England)

इंग्लंडचं माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवनने आपला जलवा कायम ठेवला. रोहितने झटपट अर्धशतक झळकावले. तर त्याला शिखरने चांगली साथ दिली. रोहितने ५८ चेंडूंमध्ये नाबाद ७६ धावा केल्या. तर शिखर धवनने नाबाद ३१ धावा केल्या.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं अवघ्या ११० धावा केल्या. जसप्रीत बुमराहने इंग्लंडचे कंबरडे मोडले. त्याने १९ धावा देत सहा गडी बाद केले. शामीनेही ३१ धावा देत ३ फलंदाजांना तंबूत धाडले. प्रसिद्ध कृष्णाने एक गडी बाद केला. इंग्लंडकडून जोस बटलरने सर्वाधिक ३० धावा केल्या. त्यांच्या चार फलंदाजांना तर भोपळाही फोडता आला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT