India vs England 1st ODI score Update / BCCI SAAM TV
Sports

India vs England 1st ODI: बुम बुम...; इंग्लंडचा ११० धावांत खुर्दा, बुमराहच्या माऱ्यासमोर लोटांगण

जसप्रीत बुमराहनं इंग्लंडच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. ११० धावांवर इंग्लंडचा डाव आटोपला.

Nandkumar Joshi

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिला एकदिवसीय सामना द ओव्हलवर होत आहे. या सामन्यात भारतानं प्रथम गोलंदाजी करताना, इंग्लंडचा अख्खा डाव अवघ्या ११० धावांत गुंडाळला. जसप्रीत बुमराहच्या माऱ्यासमोर इंग्लंडच्या दिग्गज फलंदाजांनी लोटांगण घातलं. एकट्या बुमराहनं इंग्लंडचे सहा फलंदाज तंबूत धाडले. (India vs England 1st ODI)

टीम इंडियानं (Team India) इंग्लंडविरोधात टी-२० मालिका जिंकल्यानंतर वनडे मालिकेचीही चांगली सुरुवात केली आहे. लंडनच्या ओव्हल मैदानात मंगळवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला सामना होत आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांनी केलेल्या खोचक माऱ्यासमोर इंग्लंडचे फलंदाज अक्षरशः लोटांगण घालताना दिसले. (India vs England)

बुमराह आणि मोहम्मद शामी या घातक जोडीनं इंग्लंडच्या विस्फोटक फलंदाजांना निभाव लागू दिला नाही. दोघांनी तुफान गोलंदाजी करत इंग्लंडच्या संघाला ११० धावांत गारद केले. बुमराहने सहा फलंदाज बाद केले. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीत दुसऱ्यांदा एकाच सामन्यात पाच फलंदाज बाद करण्याचा कारनामा केला.

ओव्हलच्या मैदानात भारतानं टॉस जिंकून चांगली सुरुवात केली. रोहित शर्मानं (Rohit Sharma) गोलंदाजीचा घेतलेला निर्णय पथ्यावर पडला. रोहितचा हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी फक्त १० चेंडूच पुरेसे ठरले. बुमराहने टाकलेल्या दुसऱ्या षटकाच्या चौथ्याच चेंडूवर जेसन रॉय खातं न उघडता तंबूत परतला. त्यानंतर जो रूटही पुढचे दोन चेंडू खेळू शकला. षटकाच्या अखेरच्या चेंडूवर तो सुद्धा बाद झाला.

बुमराहने जबरदस्त सुरुवात केल्यानंतर शामीही मागे राहिला नाही. त्याने बेन स्टोक्सला तंबूत धाडले. रिषभ पंतने त्याचा जबरदस्त झेल पकडला. स्टोक्सही शून्यावर बाद झाला. तर जॉनी बेयरस्टोला बुमराहने बाद केले. यावेळी सुद्धा पंतने अप्रतिम झेल टिपला.

इंग्लंडच्या जोस बटलरने काही वेळ संघर्ष केला. त्याने ३२ चेंडूंत ३० धावा केल्या. मात्र, शामीने त्याला बाद केले. प्रसिद्ध कृष्णानेही चांगली साथ दिली. मोइन अलीला त्याने बाद केले. डेविड विली आणि ब्रायडन कार्सने नवव्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी केली. त्यामुळे संघाला १०० पेक्षा अधिक धावा करता आल्या. अखेरीला बुमराहने दोन विकेट घेऊन इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. भारताविरुद्ध वनडेमध्ये इंग्लंडची ही निचांकी धावसंख्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT