Indian cricket team twitter
Sports

IND vs AUS, Turning Point: इथेच सामना फिरला! वाचा टीम इंडियाच्या शानदार विजयाचे 3 टर्निंग पॉईंट

India vs Australia, Turning Point Of The Match: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात शानदार विजयाची नोंद केली आहे. दरम्यान जाणून घ्या या सामन्यातील टर्निंग पॉईंट .

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा अहंकार मोडत २०२३ वनडे वर्ल्डकपच्या फायनलच्या पराभवाचा बदला घेतला आहे. २०६ धावांचा बचाव करताना भारतीय संघाने २४ धावांनी विजय मिळवला आहे. यासह टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. दरम्यान जाणून घ्या या सामन्यातील टर्निंग पॉईंट.

अक्षर पटेलची कॅच

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २०६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली होती. ऑस्ट्रेलियाची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू होती. एकीकडून हेड तर दुसऱ्या बाजूने मिचेल मार्श तुफान फटकेबाजी करत होता. त्यावेळी मार्श ३७ धावांवर फलंदाजी करताना कुलदीप यादव गोलंदाजीला आला. कुलदीपच्या नवव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मार्शने बॅकवर्ड स्केवर लेगच्या दिशेने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षर पटेलने सीमारेषेवर उंच उडी मारत एका हाताने शानदार झेल टिपला.

ट्रेविस हेडची विकेट

ट्रेविस हेड नेहमीच भारतीय संघांसाठी डोकेदुखी ठरतो. यावेळीही त्याने डोकेदुखी वाढवली होती. तो ऑस्ट्रेलियाला विजयाच्या दिशेने घेऊन जात होता. नेमकं त्याचवेळी जसप्रीत बुमराहने त्याला झेलबाद करत माघारी धाडलं आणि भारतीय संघाला कमबॅक करून दिलं.

कुलदीप- अर्शदीपची गोलंदाजी

कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग हे दोघेही भारतीय संघाच्या विजयाचे हिरो ठरले. अर्शदीप सिंगने विकेट घेत भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्याने आपल्या स्पेलमध्ये डेव्हिड वॉर्नर, टीम डेव्हिड आणि मॅथ्यू हेडला बाद केलं. तर कुलदीप यादवने मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेलला बाद केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT