मोहालीच्या मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल या संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर आर अश्विनला या सामन्यातून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. शुबमन गिलला साथ देण्यासाठी ऋतुराज गायकवाड मैदानावर उतरला आहे. तर वेगवान गोलंदाजी करण्यासाठी मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूरची निवड करण्यात आली आहे.
मोहालीच्या मैदानावर खेळताना असा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड:
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला, तर मोहालीत ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघावर भारी पडतो. आतापर्यंत झालेल्या ७ सामन्यांमध्ये भारतीय संघाने केवळ १ सामना जिंकला आहे. तर उर्वरित ६ सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. (Latest sports updates)
या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:
शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार,यष्टीरक्षक), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी
या सामन्यासाठी अशी आहे ऑस्ट्रेलियाची प्लेइंग ११:
डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमेरुन ग्रीन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅडम झाम्पा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.