india vs australia saam tv
Sports

IND vs AUS, Weather Report: पाऊस खेळ बिघडवणार? सामना रद्द झाल्यास टीम इंडिया सेमिफायनल शर्यतीतून बाहेर पडणार?

India vs Australia, t20 world cup 2024 Weather Forecast: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आज निर्णायक लढत रंगणार आहे. सेंट लुसियातील डॅरेन सॅमी स्टेडियमवर या दोन्ही संघांमध्ये सुपर ८ फेरीतील सामना रंगणार आहे. हा सामना सेमिफायनलमध्ये जाण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे हा सामना रद्द झाल्यास सेमिफायनलचं तिकीट कोणाला मिळणार? कसं असेल समीकरण? जाणून घ्या.

असं असेल समीकरण

हा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. त्यानंतर अफगाणिस्तानने शेवटच्या सामन्यात बांगलादेशवर विजय मिळवला, तर अफगाणिस्तानचा संघ सेमिफायनलसाठी पात्र ठरेल. यासह भारतीय संघाला देखील सेमिफायनलमध्ये जाण्याची संधी असेल.

आता दुसरं समीकरण समजून घ्या. जर हा सामना पावसामुळे रद्द केला गेला तर दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. त्यानंतर शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ बांगलादेशकडून पराभूत झाला तर, ऑस्ट्रेलियाचा संघ सेमिफायनलसाठी पात्र ठरेल.

भारतीय संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजयासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. भारताने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला धूळ चारली. तर दुसऱ्या सामन्यात बांगलादेशवर जोरदार विजय मिळवला. आता ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन भारतीय संघ सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्ध विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

तर ग्रुप १ मधील संघांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर ,भारतीय संघ २ पैकी २ संघ जिंकून ४ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाने २ पैकी १ सामना जिंकून २ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर अफगाणिस्तानने देखील १ सामना जिंकला आहे. हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. तर एकही सामना न जिंकलेला बांगलादेशचा संघ चौथ्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Police Transfer : मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या, कारण काय?

Maharashtra Live News Update: भरधाव अनियंत्रित चारचाकी कारने चार जणांना उडवले.अमरावती शहरातील मोती नगर मधील धक्कादायक घटना

Hair Care: तुमच्या केसांसाठी कोणता शॅम्पू आहे परफेक्ट, एकदा जाणून घ्या

पतीशी भांडण, पोलिसाशी अफेअर, शरीरसंबंध अन् हत्या; आरोपीचा खरा चेहरा 'असा' समोर आला

Palak Pakoda Recipe: थंडीत संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा स्ट्रीट स्टाईल पालक भजी, ही आहे सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT