भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल येथे खेळला गेला. हा तिसरा सामना वॉशिंग्टनच्या सुंदर खेळीनं टीम इंडियानं जिंकला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वॉशिंगटन सुंदरनं नाबाद राहत ४९ धावांची विजयी खेळी केली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर १८७ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने शानदार सुरुवात करत सामना जिंकला. गोलंदाजी करताना अर्शदीप सिंगने भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला तीन धक्के दिले. अर्शदीपने या सामन्यात ३५ धावा देत ३ विकेट घेतल्या. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे त्याल प्लेअर ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.
कॅनबेरा येथे दोन्ही संघांमधील टी२० मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता. तर ऑस्ट्रेलियन संघाने मेलबर्नमधील टी-२० सामना ४ विकेट्सने जिंकला होता. आता तिसरा सामना भारतानं ५ विकेट राखत जिंकलाय. ऑस्ट्रेलियानं दिलेलं धमाकेदार आव्हान भारतानं १८.३ षटकांत गाठले. या मैदानावर टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील ही सर्वात मोठी धावसंख्या होती. भारतीय संघाने ५ विकेट या पूर्ण केली. या विजयासह भारताने टी२० मालिका १-१ अशी बरोबरी केलीय.
आता टी-२० मालिकेतील चौथा सामना गुरुवार ६ नोव्हेंबर रोजी गोल्ड कोस्ट येथे खेळला जाणार आहे. होबार्ट टी-२० मध्ये वॉशिंग्टन सुंदरने २३ चेंडूत नाबाद ४९ धावा करत भारताला शानदार विजय मिळवून दिला. ४९ धावा करताना वॉशिंगटनने यामध्ये चार षटकार आणि तीन चौकार मारलेत. दोन्ही संघांमधील टी-२० मालिकेतील पहिला सामना कॅनबेरा येथे पावसामुळे वाया गेला. नंतर मेलबर्न येथे झालेला दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने ४ विकेट्सने जिंकला.
ऑस्ट्रेलियानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल सलामीसाठी आले. अभिषेकनं दमदार सुरुवात केली. परंतु तो मोठी खेळी शकला नाही. त्याला नाथन एलिसने २५ धावांवर बाद केले. त्यानंतर एलिसने शुभमन गिलला १५ धावांवर बाद केले. कर्णधार सूर्यकुमार यादवदेखील मोठी खेळी करण्यास अपयशी ठरला. सुर्याकुमार २४ धावा करून बाद झाला. कर्णधाराची विकेट पडल्यानंतर अक्षर पटेल (१७ धावा) आणि तिलक वर्मा यांनी एकत्रितपणे धावसंख्या १०० च्या पुढे नेली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.