Arshdeep Singh celebrates after taking three wickets as Australia set a 187-run target for India in the 3rd T20 at Hobart. saamtv
Sports

IND vs AUS Hobart T20: भारतासमोर इतक्या धावांचे लक्ष्य , डेव्हिड स्टोइनिसनं झळकावलं धमाकेदार अर्धशतक

India vs Australia Hobart T20I: मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध निराशाजनक कामगिरी केली होती. आज भारतीय संघ होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हलवर होणाऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.

Bharat Jadhav

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना आज (२ नोव्हेंबर) होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल येथे खेळला जातोय. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी १८७ धावांचे लक्ष्य ठेवले. टिम डेव्हिडने ७४ आणि मार्कस स्टोइनिसने ६४ धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंगने तीन विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही. अर्शदीप सिंगने पहिल्या षटकात ट्रॅव्हिस हेड (६) आणि तिसऱ्या षटकात जोश इंग्लिस (१) यांना बाद केलं. यानंतर फलंदाजीला टीम डेव्हीडनं २३ चेंडूत अर्धशतक केलं. दरम्यान भारताला तिसरी विकेट ९ षटकात मिळाली. ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का वरूण चक्रवर्तीनं दिला. वरुणने कर्णधार मिचेल मार्शला ११ धावांवर बाद केलं. याच षटकात वरूण चक्रवर्तीने मिच ओवेनलाही बाद केले.

त्यानंतर शिवम दुबेने १३ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर टिम डेव्हिडला ७४ धावांवर बाद केलं. त्यानंतर मार्कस स्टोइनिसने धमाकेदार अर्धशतक झळकावत ६४ धावांची शानदार खेळी केली. अर्शदीप सिंगने त्याला शेवटच्या षटकात बाद केले. अर्शदीप सिंगने तीन तर वरुण चक्रवर्तीने दोन विकेट्स या डावात घेतल्या.

टी-२० मालिकेतील तिसरा सामना होबार्ट येथे खेळवण्यात आला. या सामन्याच्या सुरुवातीला दोन उल्लेखनीय गोष्टी घडल्या. पहिली गोष्ट म्हणजे कर्णधार सूर्यकुमारने नाणेफेक जिंकली आणि दुसरे म्हणजे, अर्शदीप सिंगने प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन केलं. अर्शदीपचे पुनरागमन चर्चेत होतं कारण त्याच्या प्रभावी टी-२० कामगिरीनंतरही अर्शदीपला संघात नियमित स्थान मिळालेले नव्हतं. पण तिसऱ्या सामन्याच्या संघात त्याला घेण्यात आले. टी-२० मध्ये शानदार पुनरागमन करताना, अर्शदीप सिंगने त्याच्या स्पेलमध्ये (३/३५) ३ बळी घेतले आणि भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऑक्टोबर - नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळणार? लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Maharashtra Live News Update: निवडणुकांमुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन १० दिवस पुढे जाण्याची शक्यता

Accident : खडीने भरलेल्या ट्रकची प्रवासी बसला जोरात धडक, २० जणांचा जागेवरच मृत्यू, अनेकजण जखमी

3 November 2025 Rashi Bhavishay: करिअर अन् आर्थिक स्थिती सुधारणार, तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा?

Pancreatic Cancer: तुमच्या पायात दिसतोय का 'हा' बदल? जीवघेण्या कॅन्सरची असू शकते लक्षण, तज्ज्ञांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT