ind vs aus twitter
Sports

Ind vs Aus 2nd Test: दुसऱ्याच सेशनमध्ये टीम इंडियाचा पॅकअप! अवघ्या इतक्या धावांवर आटोपला डाव

India vs Australia 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे.

Ankush Dhavre

भारत आणिा ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना अॅडलेटच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यानप प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या १८० धावांवर आटोपला आहे.

मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा खेळताना दिसून आला नव्हता. पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. दुसऱ्या सामन्यात रोहितने कमबॅक केलं. मात्र तो सलामीला फलंदाजीला आला नाही.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणिक केएल राहुल यांची जोडी मैदानावर आली. मात्र या जोडीला हवी तशी सुरुवात करता आली नाही. जयस्वाल पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर केएल राहुल ३७ धावा करत माघारी परतला.

शुभमन गिल या डावात सेट झाला होता, मात्र त्याने ३१ धावांवर पॅव्हेलियनची वाट धरली. विराट कोहलीकडून या डावात मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो अवघ्या ७ धावांवर बाद झाला. रिषभ पंतला या डावात २१ धावा करता आल्या. नितीश कुमार रेड्डी आणि आर अश्विनने मिळून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. दोघांनी मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. पण अश्विन २२ धावांवर आणि नितीश रेड्डी ४२ धावांवर माघारी परतला.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

भारत- यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), नितीश रेड्डी, रविचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया - पैट कमिंस (कप्तान), उस्मान ख्वाजा, नाथन मैकस्वीनी, मार्नस लैबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, स्कॉट बोलँड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

SCROLL FOR NEXT