India vs Australia 2nd odi
India vs Australia 2nd odi Saam TV
क्रीडा | IPL

IND vs AUS : गिलचा फ्लॉप शो, सूर्यकुमारचं सरेंडर, भारताचा वनडेत सर्वात मोठा पराभव; नकोसा विक्रम नावावर

Satish Daud-Patil

India vs Australia 2nd odi : वनडे मालिकेतील पहिला सामना सहज खिशात टाकणाऱ्या टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव स्वीकारावा लागला. विशाखापट्टणमच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियन संघाने टीम इंडियाचा १० विकेट्सनी धुव्वा उडवला. हा पराभव भारतीय संघाच्या चांगलाच स्मरणात राहणार आहे. कारण भारताचा हा वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव आहे.  (Latest sports updates)

रविवारी विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना केवळ ११७ धावा केल्या. टीम इंडिया अवघ्या २६ षटकांत गडगडली, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने (Australia) ११ षटकांत हे लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाने भारतावर १० गडी आणि २३४ चेंडू राखून विजय मिळवला एकदिवसीय क्रिकेटमध्ये चेंडू शिल्लक असताना भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे.

भारताचा यापूर्वी सर्वात मोठा पराभव हा २०१९ साली झाला होता. हा सामना न्यूझीलंडबरोबर होता आणि तो हॅमिल्टन येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताला (Team India) न्यूझीलंडने तब्बल २१२ चेंडू राखून पराभूत केले होते. म्हणजेच न्यूझीलंडने ३५ षटके आणि दोन चेंडू राखून भारतावर मोठा विजय साकारला होता. पण भारताचा यापेक्षा मोठा पराभव यावेळी पाहायला मिळाला. कारण या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तब्बल २३४ चेंडू राखून भारताला पराभव केला.

दुसरा वनडे सामना (India vs Australia) भारतीय संघ सहज जिंकेल, अशी अपेक्षा क्रिडाप्रेमींना होती. मात्र, या सामन्यात भारताला कोणतीही चमक दाखवता आली नाही. फलंदाजांनी पुरती हाराकिरी केली. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात लाजिरवाणी झाली. टीम इंडियाचा शुभमन गिल शून्य धावावर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा १३ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादवची दुसऱ्या सामन्यातही बॅट तळपळली नाही. हार्दिक पांड्यानेही (Hardik Pandya) अवघी एकच धाव केली.

विराट कोहली चांगली फंलदाजी करत होता, मात्र, तोही १६ व्या षटकात बाद झाला. विराट ३५ चेंडूत ३१ धावा ठोकल्या. रविंद्र जडेजाने १६ धावा ठोकल्या. कुलदीप यादवने ४ आणि मोहम्मद शमी शून्य धावांवर बाद झाला. स्टार्कने ५ गडी बाद केले. तर सीन एबॉटने १ गडी बाद केला. या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने सामना जिंकून १-१ ने बरोबरी केली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha 2024 : मविआ आणि महायुतीच्या ४ प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नोटीसा; ४८ तासात हिशेब देण्याची सूचना

Khalistani Terrorist: हरदीपसिंह निज्जर हत्या प्रकरणात 3 संशयितांना अटक; कॅनडा पोलिसांची कारवाई, भारतावर गंभीर आरोप

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

SCROLL FOR NEXT