Ind Vs Aus Test Series Saamtv
क्रीडा

Ind Vs Aus Series: कुंकवाचा टिळा लावताना केली 'अशी' कृती; सिराज,उमरान मलिकचा Video पाहून संतापले नेटकरी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघ नागपुरात दाखल झाला आहे

Gangappa Pujari

Nagpur: न्यूझीलंडला धुळ चारल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. येत्या ९ फेब्रूवारीपासून नागपुरमध्ये या मालिकेतील पहिला कसोटी सामना रंगणार आहे. या मालिकेसाठी दोन दिवसांपुर्वीच ऑस्ट्रेलियाचा संघ नागपुरात दाखल झाला आहे.

भारतीय संघही नागपुरमध्ये दाखल झाला आहे. वेळी उमरान मलिक आणि मोहम्मद सिराज यांनी केलेली एका कृतीवरुन सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. (Nagpur News)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघ नागपुरात दाखल झाला आहे. यावेळी रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये चेक इन करताना भारतीय परंपरेनुसार, हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी त्यांच्या कपाळावर टिळा लावून संघाचे स्वागत केले. यावेळी भारतीय क्रिकेटपटू आणि वेगवान जोडी उमरान मलिक आणि मोहम्मद सिराज यांनी कपाळावर कुंकवाचा टिळा लावून घेण्यास नकार दिला.

या दोघांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचे स्वागत हसून स्वीकारले परंतु त्यांच्या कपाळावर टिळा लावू नका असा हाताने इशारा केला. हे दोघेच नाही तर भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड हे सुद्धा टिळा लावून घेण्यास नाकारताना दिसले.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी या दोन्ही खेळाडूंना जोरदार ट्रोल केले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत दोन्ही खेळाडूंना खडेबोल सुणावले आहेत. तर काही जणांनी हा ज्याच्या त्याच्या श्रध्देचा भाग आहे असे म्हणत या खेळाडूंचे समर्थनही केले आहे.

दरम्यान, मागील महिन्यात क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या अपघातानंतर (Rishabh Pant Accident) भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनी मित्राच्या आरोग्यात सुधारणेची प्रार्थना करण्यासाठी उज्जैनमधील नुकत्याच उद्घाटन झालेल्या महाकाल मंदिराला भेट दिली होती. त्यांनी पहाटे मंदिरात भगवान शंकराच्या भस्म आरतीमध्येही भाग घेतला होता. (Indian Team)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : महाराष्ट्रात बहुमत कोणाला ? मविआचा प्लान बी तयार

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT