Rain washes out India vs Australia 1st T20 in Vizag; Suryakumar and Gill’s batting shines bright. 
Sports

India vs Australia: ऐन रंगात आलेल्या मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय; वरुणराजाच्या गोंधळानं पहिल्या टी२० सामना रद्द

India vs Australia 1st T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना मुसळधार पावसामुळे रद्द झालाय. पावसामुळे सामना रद्द झाला असला तरी सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांनी त्यांच्या छोट्या पण जबरदस्त फलंदाजीने प्रभावित केलं.

Bharat Jadhav

  • भारत-ऑस्ट्रेलिया टी२० सामना पावसामुळे रद्द

  • सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिलची चमकदार फलंदाजी.

  • चाहत्यांना निराशा, सूर्यकुमार यादव आणि शुभमनच्या फलंदाजीने क्रिकेट प्रेमी खूश

भारत-ऑस्ट्रेलियातील पहिल्या २० सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. ऐन रंगात आलेल्या सामन्यात वरुण राजाने एंट्री घेतली. मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं सामना काही वेळ थांबवण्यात आला. त्यावेळी भारतीय संघाने ९० धावांवर एक विकेट गमावली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कॅनबेरा येथील ओव्हल येथे पहिला टी२० सामना खेळण्यात आला. मात्र पावसाने सर्व क्रिकेट चाहत्यांची निराशा केली.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. या संधी भारतीय फंलदाजींना सोनं केलं. अभिषेष शर्मा आणि शुबमन गिल यांनी धमाकेदार सुरुवात केली. सामना रद्द होण्यापूर्वी टीम इंडियाने ९.४ षटकांत १ गडी गमावून ९७ धावा केल्या. भारतीय संघाच्या डावाच्या सुरुवातीलाही पावसाने व्यत्यय आणला. त्यानंतर सामना १८ षटकांचा करण्यात आला.

सामना सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा पावसामुळे खेळात व्यत्यय आला. त्यानंतर सामना रद्द करण्यात आला. या डावात शुबमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी शानदार फलंदाजी केली. शुबमन गिलने २० चेंडूत ३७ धावा केल्या. सूर्यानेही २४ चेंडूत ३९ धावा केल्या. त्यांच्या आधी अभिषेक शर्मानेही १४ चेंडूत १९ धावा केल्या.

सूर्यकुमार यादवने इतिहास रचला

भारतीय टी२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने आपल्या टी२० करिअरमध्ये १५० षटकार मारण्याचा नवा विक्रम केलाय. असा पराक्रम करणारा सूर्यकुमार हा जगातला पाचवा फलंदाज बनलाय. आजच्या पहिल्या टी२० सामन्यात पहिलाच षटकार मारत सूर्य कुमारनं हा विक्रम साध्य केलाय. सूर्यकुमारच्या कामगिरीतील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे तो १५० टी-२० षटकार मारणारा भारताचा फक्त दुसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी हा पराक्रम भारतीय कर्णधार रोहित शर्माने केला होता. आता डावांच्या बाबतीत सूर्याने रोहितला मागे टाकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

पवार-ठाकरेंना हवी मनसे? काँग्रेसला राज ठाकरे नकोसे?

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला शिंदेसेनेनं दिला धक्का

SCROLL FOR NEXT