India vs Australia 1st ODI IND vs AUS Weather Update Mohali weather update today Cricket news in marathi  saam tv news
Sports

IND vs AUS, Weather Update: पावसामुळे पहिला वनडे रद्द होणार? असं असेल मोहालीतील हवामान

India vs Australia Weather Report: जाणून घ्या सामन्यावेळी कसं असेल हवामान

Ankush Dhavre

India vs Australia Weather Report:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज मोहालीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी संघातील मुख्य खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर रोहित शर्माच्या जागी केएल राहुल संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या कसं असेल मोहालीतील हवामान.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार सामन्याच्या दिवशी मोहालीत पाऊस पडणार नाही. सामन्यावेळी तापमान २४ डिग्री सेल्सिअस ते ३३ डिग्री सेल्सिअसच्या मध्ये असेल. दोन्ही डावात ५०-५० षटकांचा सामना पाहायला मिळू शकतो.

तसेच खेळपट्टीबद्दल बोलायचं झालं तर ही खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर ठरू शकते. गेल्या ५ सामन्यांचा रेकॉर्ड पाहिला तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सरासरी २५३ धावा केल्या आहेत. तसेच नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती..

या सामन्यात केएल राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर विराट कोहली, हार्दिक पंड्या, रोहित शर्मा आणि कुलदीप यादव यांना सुरुवातीच्या २ सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. (Latest sports updates)

हे खेळाडू तिसऱ्या वनडेत कमबॅक करताना दिसतील. या सामन्यात रविंद्र जडेजा उपकर्णधाराची भूमिका बजावताना दिसून येणार आहे. तर आर अश्विनला देखील प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला, तर मोहालीत ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघावर भारी पडतो. आतापर्यंत झालेल्या ७ सामन्यांमध्ये भारतीय संघाने केवळ १ सामना जिंकला आहे. तर उर्वरित ६ सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT