team india saam tv news
क्रीडा

Team India Playing XI: गिलचं पुनरागमन तर संजूला मिळणार संधी? अंतिम सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग ११

Ankush Dhavre

India vs Afghanistan Playing 11 Prediction:

भारतीय संघाला अफगाणिस्तानचा सुपडा साफ करण्याची संधी असणार आहे. ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. यासह मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे.

मालिकेतील तिसरा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल पाहायला मिळू शकतात.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. हे मैदान गोलंदाजांसाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. कारण याच मैदानावर अनेक हाय स्कोरिंग सामने पाहायला मिळाले आहेत.

गेल्या २ सामन्यात शून्यावर बाद होणाऱ्या रोहित शर्मावर या सामन्यात मोठी खेळी करण्याची जबाबदारी असणार आहे. तो मोहालीमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात शून्यावर धावबाद झाला होता. तर दुसऱ्या सामन्यातही तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला होता.

तिसऱ्या टी -२० सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल पाहायला मिळू शकतो. या सामन्यात रोहित शर्मा तीन फिरकी गोलंदाजांऐवजी दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. जर दोन फिरकी गोलंदाज उतरले तर अतिरिक्त वेगवान गोलंदाज म्हणून आवेश खानला संघात स्थान दिले जाऊ शकते.

तर वरच्या फळीत नेहमीप्रमाणे रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली खेळताना दिसून येऊ शकतात. तर जितेश शर्मा चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसून येऊ शकतो. शिवम दुबेने गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावले आहेत. (Latest sports updates)

त्यानंतर रिंकू सिंग, अक्षर पटेल खेळताना दिसतील. वॉशिग्ंटन सुंदरच्या जागी आवेश खानला प्लेइंग ११ मध्ये प्रवेश दिला जाऊ शकतो. तर वेगवान गोलंदाज म्हणून मुकेश कुमार, अर्शदीप सिंग खेळताना दिसतील.

तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, आवेश खान/वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंह.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, या राशीच्या व्यक्तींच्या मनातील इच्छा होणार पूर्ण; फक्त कर्म चांगले ठेवा

Horoscope Today : कोणाच्या राशीत आज काय? वाचा राशीभविष्य

Fact Check : एअरफोन वापरल्याने चेहर्‍याला मारू शकतो लकवा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Mrunal Thakur: आंखों ही आंखों में इशारा हो गया...

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरच्या नव्या लूकची चर्चा, नेटकऱ्यांनी उर्फीसोबत केली तुलना

SCROLL FOR NEXT