SA vs IND: भारताला मोठा धक्का; उपकर्णधार दुखापतग्रस्त, मालिकेतून बाहेर
SA vs IND: भारताला मोठा धक्का; उपकर्णधार दुखापतग्रस्त, मालिकेतून बाहेर Saam TV
क्रीडा | IPL

SA vs IND: भारताला मोठा धक्का; उपकर्णधार दुखापतग्रस्त, मालिकेतून बाहेर

वृत्तसंस्था

दक्षिण आफ्रिका (Sauth Africa) मालिकेपूर्वी भारतासाठी वाईट बातमी आली आहे. टी-२० नंतर एकदिवसीय संघाचा कर्णधार बनलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबईत प्रशिक्षणादरम्यान जखमी झाल्याने तो कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याला अलीकडेच अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) जागी टीम इंडियाचा (Team India) नवा उपकर्णधार बनवण्यात आले होते. भारतीय संघ १६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. बीसीसीआयने सांगितले की, रोहितच्या जागी गुजरातचा फलंदाज प्रियांक पांचालचा संघात समावेश करण्यात आला आहे.

बीसीसीआयने म्हटले आहे काल मुंबईतील सराव सत्रादरम्यान रोहितला डाव्या हाताला दुखापत झाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतून तो बाहेर पडला आहे. मुंबईत सराव करताना रोहितला दुखापत झाली आणि तो बराच काळ सरावात सहभागी झाला नाही. नवीन कसोटी उपकर्णधार रोहित शर्मासह अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, केएल राहुल आणि शार्दुल ठाकूर यांनी रविवारी दुपारी शरद पवार अकादमीमध्ये नेटमध्ये सराव केला.

यापूर्वी, रोहित शर्माच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीटीआयने सांगितले होते की, "रोहितच्या हाताला दुखापत झाली आहे परंतु वैद्यकीय पथक त्याकडे लक्ष देत आहे." परंतु हाताच्या दुखापतीची बाब बीसीसीआयने नाकारली होती. दक्षिण आफ्रिका मालिकेत रोहित शर्मा, ऋषभ पंत, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीचे पुनरागमन झाले आहे. हे खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर होते. आता रोहित यातून बाहेर पडला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024: शिवम दुबेची अफलातून फलंदाजी; या बाबतीत दिग्गजांनाही सोडलं मागे

Hot Water Benefits: जेवण केल्यानंतर गरम पाणी पिण्याचे फायदे काय?

Mumbai Crime: कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार; पत्नीने बनवला व्हिडिओ अन्.. मुंबईतील संतापजनक घटना

IPL 2024 Playoffs: CSK चं टेन्शन वाढलं! प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी करावं लागेल हे काम

Anuj Thapar News : "अनुज थापरची आत्महत्या नाही तर हत्या...", कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

SCROLL FOR NEXT