rohit sharma, india, england, covid19 positive saam tv
Sports

टीम इंडियाला आणखी एक झटका; कर्णधार राेहित शर्मास काेराेनाची लागण; पंत करेल नेतृत्व?

भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी रविचंद्रन अश्विनला कोरोनाची लागण झाली होती. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर विराट कोहलीलाही संसर्ग झाला.

साम न्यूज नेटवर्क

एजबॅस्टन : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) कोरोनाची (corona) लागण झाली आहे. भारतीय संघास (indian cricket team) येत्या १ जुलैपासून इंग्लंडविरुद्धच्या (England) कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळायचा आहे. जो गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे झाला नव्हता. यंदा देखील हा बहुतांश खेळाडू काेराेना संक्रमित हाेऊ लागल्याने हा सामना धोक्यात आला आहे. (rohit sharma latest marathi news)

शनिवारी झालेल्या सराव सामन्यात रोहित शर्माने फलंदाजीस आला नाही नाही. त्याचे नेमके कारण कोणालाच समजले नाही. सध्या रोहित फॉर्ममध्ये नसताना ताे सराव सामन्यासाठी आला नाही म्हणून क्रिकेटजगतात चर्चा झाली. दरम्यान रात्री उशिरा त्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आल्याने चर्चेस विराम मिळाला.

बीसीसीआयने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे: "टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याचा रॅपिड अँटीजेन चाचणीनंतर (आरएटी) कोविड-19 चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तो सध्या आयसोलेशनमध्ये आहे. वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. त्याची सीटी व्हॅल्यू निश्चित करण्यासाठी रविवारी आरटी-पीसीआर चाचणी घेतली जाईल."

आता टीम इंडियाला कर्णधार रोहितशिवायही पहिली कसोटी खेळावी लागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीत ऋषभ पंतकडे (Rishabh Pant) टीम इंडियाचे नेतृत्व जाऊ शकेल. तथापि, रोहितलाही तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे, कारण इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेदरम्यान केन विल्यमसन आणि टॉम लॅथम यांनाही कोरोनाची लागण झाली होती, परंतु दोघेही तिसरा कसोटी सामना खेळत आहेत.

रॅपिड अँडिजन टेस्टमध्ये रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यानंतर त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून त्याची काळजी घेतली जात आहे. आता रोहितला सतत आरटीपीसीआर चाचण्या द्याव्या लागतील आणि तो कोरोनामधून बरा होईपर्यंत त्याला आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. आरटीपीसीआर चाचणी सतत नकारात्मक आल्यास रोहित लवकरच टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahisar Fire: दहिसरमधील मेघा पार्टी हॉलला भीषण आग, आग शमविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू

Shocking: गे पार्टनरकडून चिमुकलीवर बलात्कार, संतापलेल्या बापाने त्याचा प्रायव्हेट पार्टच कापला

Ahilyanagar Crime: हात-पाय फॅक्चर, एक डोळा निकामी; जुन्या वादातून तरुणाला जीवघेणी मारहाण, नेवासातील संतापजनक घटना|Video Viral

Panvel Horror: धक्कादायक! एकाच कुटूंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू, पनवेलमधील घटना

IND VS AUS: तुला कॉल द्यावा लागेल..; भरसामन्यात रोहित-अय्यरमध्ये जुंपली, दोघांमध्ये नेमका काय झाला मॅटर|Video Viral

SCROLL FOR NEXT