IND vs AFG saam tv
Sports

IND vs AFG: १ डाव आणि ३०० रन्स! अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी; कसोटीतील सर्वात मोठा विजय नावावर

भारताने अफगाणिस्तानचा न्यू चंदीगडमध्ये झालेल्या एकमेव टेस्ट सामन्यात एक डाव आणि ३०० धावांनी पराभव केला. हा भारताचा अफगाणिस्तानविरुद्धचा सर्वात मोठा टेस्ट विजय ठरला असून संघाने दमदार कामगिरी करत इतिहास रचला.

Surabhi Jayashree Jagdish

भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात न्यू चंदीगडमध्ये टेस्ट सामना खेळवला गेला. या एकमेव टेस्ट सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला. भारताने हा सामना एक डाव आणि ३०० रन्स इतक्या मोठ्या फरकाने जिंकला. अफगाणिस्तानविरुद्धचा भारताचा हा सर्वात मोठा टेस्टमधील विजय आहे.

तिसऱ्या दिवशी संपवला खेळ

टीम इंडियाने हा सामना तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात संपवला. टेस्ट क्रिकेटमधील भारताचा हा सर्वात मोठा डावाने मिळवलेला विजय होता. यापूर्वी ऑक्टोबर २०१८ मध्ये राजकोटच्या मैदानावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध एक डाव आणि २७२ रन्सने विजय मिळवला होता.

सामन्यात टीम इंडियाने पहिला डाव ८ गडी बाद ५६४ रन्सवर घोषित केला. त्यानंतर अफगाणिस्तानची टीम पहिल्या डावात १५२ रन्सवर गारद झाला आणि त्यांना फॉलो-ऑन देण्यात आला. पहिल्या डावाच्या आधारावर भारताने ४१२ रन्सची मोठी आघाडी घेतली. तर दुसऱ्या डावात अफगाणिस्तानची टीम ११२ रन्सवर पव्हेलियनमध्ये परतली.

फॉलो-ऑन खेळतानाही अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली. मोहम्मद सिराजने अब्दुल मलिकला अवघ्या ८ रन्सवर बाद केलं. त्यानंतर अफगाणिस्तानने विकेट्स पडत राहिल्या. ओपनर सेदिकुल्ला अटलने सर्वाधिक ४२ रन्स केले. रहमानुल्ला गुरबाजने २४ रन्स आणि रहमत शाह १३ रन्स केले. या तिघांशिवाय कोणालाही दुहेरी संख्या गाठता आली नाही. स्पिनर गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरने चार आणि कुलदीप यादवने तीन विकेट्स घेतले. दुखापतीमुळे शराफुद्दीन फलंदाजीला आला नाही.

मानव शुथारने घेतले ६ विकेट्स

पहिल्या डावात अफगाण टीमची सुरुवात खराब झाली. खेळाच्या दुसऱ्या दिवशी अफगाणिस्तानने पाच विकेट्स गमावले. फिरकी गोलंदाज मानव सुथारने अब्दुल मलिक (१६ धावा), रहमानुल्ला गुरबाज (१७ धावा) आणि अफसर झाझाई (३ धावा) यांची विकेट घेतली. हा सुथारचा डेब्यूचा सामना होता. दरम्यान, वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने सेदिकुल्ला अटल (१७ धावा) आणि कर्णधार हशमतुल्ला शाहिदी (२० धावा) यांना आऊट केलं. रहमत शाहने उत्तम फलंदाजी करून अफगाण डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी प्रसिद्ध कृष्णाने अझमतुल्ला उमरझाईला आऊट करून भारतीय टीमला यश मिळवून दिलं. मात्र रहमत शाहची फलंदाजी सुरूच राहिली आणि तो भारताविरुद्ध ५० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला अफगाण फलंदाज ठरला. शराफुद्दीन अश्रफने (११ धावा) रहमतला साथ देण्याचा प्रयत्न केला पण मानव सुथारने त्याची विकेट काढली.

मानव सुथारने रहमत शाहला बाद करून पाच विकेट्स पूर्ण केले. रहमतने १३५ चेंडूंमध्ये नऊ चौकार आणि एका षटकारासह ६० रन्स केले. त्यानंतर मानव सुथारने मोहम्मद सलीम साफीला बाद करून सहावा विकेट घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाष्टा, सहलीपासून घरखर्चापर्यंत प्रत्येक गोष्टीत व्यवहार! "टीटीएम" च्या हिशोबाला कंटाळून पुण्यातील दाम्पत्याचा घटस्फोट

इंडिया आघाडीच्या बैठकीत २५ पक्षांचे नेते; 'या' ५ मुद्द्यांवर झाले एकमत, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची एकमुखाने मागणी

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये वादळी वारा पावसाने डाळिंब बागेला फटका

शक्तिपीठ महामार्गावरून राजकारण तापलं; समर्थक-विरोधक आमने-सामने; कोल्हापूरात मोठा गोंधळ

मार्कशीटच नाही, लिव्हिंगही नाही! मराठी शाळेतील नववी, दहावीचे वर्ग बंद; ६० विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

SCROLL FOR NEXT