India men hockey team Asian Games 2026 gold medal saam tv
Sports

हॉकी संघाने इतिहास घडवला! टीम इंडियानं आशियाई क्रीडा स्पर्धेत पाचव्यांदा जिंकलं सुवर्णपदक

Indian Men’s Hockey Team Wins Fifth Asian Games Gold: भारतीय पुरुष हॉकी संघाने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मलेशियाचा ५-१ असा पराभव करून पाचव्यांदा सुवर्णपदक जिंकले. या विजयासह भारतीय संघाने लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकसाठीही पात्रता मिळवलीय.

Bharat Jadhav

भारतीय हॉकी संघाने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास घडवलाय. शनिवारी 'गिफू प्रीफेक्चरल ग्रीन स्टेडियम'वर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने मलेशियाचा ५-१ असा पराभव करत पाचव्यांदा सुवर्णपदक जिंकलंय. या विजयामुळे भारतीय संघाने लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकसाठीही पात्रता मिळवली आहे.

२०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या सुवर्णपदकांची संख्या आता २१ वर पोहोचलीय. हॉकी खेळात भारतीय संघाने मोठा इतिहास घडलाय. महिला आणि पुरुष संघाने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याची घटना पहिल्यांदा घडलीय. दोन्ही संघांनी ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवलीय.

भारताने अंतिम सामना एकतर्फी बनवला होता. भारतीय संघाच्या खेळाडूंपुढे मलेशियाच्या खेळाडूंना प्रभावी प्रतिकार करता आला नाही. पहिल्या सत्रात भारताच्या हरमनप्रीत सिंगने ११ व्या मिनिटाला गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १४ व्या मिनिटाला मलेशियाने बरोबरी साधली. दुसऱ्या सत्रात २३ व्या मिनिटाला भारताने पुन्हा गोल करत २-१ अशी आघाडी घेतली. यावेळी गुरजराज सिंहने गोल केला.

तिसऱ्या सत्रात, ४२ व्या मिनिटाला हार्दिकने गोल करून आघाडी ३-१ अशी वाढवली. चौथ्या सत्रात, ५४ व्या मिनिटाला शिलानंदने गोल केला आणि त्यानंतर ५७ व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने आणखी एक गोल करून भारताची आघाडी ५-१ अशी केली.

भारताने पाचव्यांदा सुवर्णपदक जिंकले

भारतीय पुरुष हॉकी संघाने यापूर्वी चार वेळा सुवर्णपदक जिंकले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत चॅम्पियन ठरण्याची भारतीय पुरुष हॉकी संघाची ही पाचवी वेळ आहे. भारताने हे विजेतेपद सर्वप्रथम १९६६ मध्ये बँकॉक येथे जिंकले होते. त्यानंतर, १९९८ मध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकले; ती स्पर्धाही बँकॉक येथेच आयोजित करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kidney disease - सावधान! 'हे' दोन सामान्य आजार गपचूप खराब करत आहेत तुमची किडनी; सुरुवातीला दिसतच नाहीत लक्षणे

Sunday Horoscope: मेषसह या 3 राशींसाठी आजचा दिवस खास; कामात यश, मिळणार आनंदाची बातमी

Pune : पुण्याच्या हृदयात वसलेलं निसर्गरम्य ठिकाण! वीकेंडला चला फिरायला

Maharashtra News Live Update: राज्यात महाविकास आघाडीचं सेव्ह डेमोक्रसी संयुक्त आंदोलन

RRR चा धमाका! राहुलचे वादळी शतक; ऋतुराजची संयमी खेळी अन् रोहितचा तडाखा, विडिंजसमोर विराट आव्हान

SCROLL FOR NEXT