suryakumar yadav news  Saam tv
Sports

सूर्यकुमारची अर्धशतकी खेळी ठरली गेमचेंजर! भारतानं अमेरिकेला नमवलं! टीम इंडियाची विजयी सलामी

suryakumar yadav news : सूर्यकुमार यादवची अर्धशतकी खेळी गेमचेंजर ठरली आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने अमेरिकेला नमवलं.

Vishal Gangurde

टी२० विश्वचषकाच्या स्पर्धेत विजयी टीम इंडियाची विजयी सलामी

टीम इंडियाने चारली अमेरिकेला धूळ

सूर्यकुमार यादवच्या खेळीपुढे अमेरिका नमली

टीम इंडियाने शनिवारी टी२० विश्वचषकाच्या स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने अमेरिकेला २९ धावांनी धूळ चारली. प्रथम फलंदाजी करताना भारताने खराब कामगिरी केली. अमेरिकेच्या गोलंदाजांच्या जाळ्यात टीम इंडियाचे फलंदाज अकडले. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने अमेरिकेला नमवलं.

टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात ९ गडी गमावून १६१ धावा केल्या होत्या. या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजीची सुरुवात खराब झाली. फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने संघाचा डाव सावरला. टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना संघाने २० षटकात ८ गडी गमावून १३२ धावा केल्या. अमेरिकेचा संघ १३२ धावांवर बाद झाल्याने टीम इंडिया २९ धावांनी जिंकली.

सूर्यकुमारची वादळी खेळी

भारत विरुद्ध यूएसएच्या विरोधात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवची खेळी गेमचेंजर ठरली. सूर्यकुमार यादवने ८४ धावांची नाबाद खेळी गेमचेंजर ठरली. त्याने या डावात १० चौकार आणि ४ षटकार लगावले. सूर्यकुमारच्या खेळीच्या जीवावर भारताने अमेरिकेला १६२ धावांचं आव्हान दिले.

अमेरिकेच्या संघाच्या फलंदाजांना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जेरीस आणलं. गोलंदाजांनी अमेरिकेच्या संघाला अवघ्या १३२ धावांवर गुंडाळलं. टीम इंडियासाठी मोहम्मद सिराजने ३ विकेट घेतले. तर अक्षर पटेलने २ विकेट घेतले. अर्शदीप सिंहने २ विकेट घेतले. तर वरुणने एक विकेट घेतला.

टी२० वर्ल्डकपचा भारताचा पुढील सामना १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. भारताचा पुढील सामना नामिबियाच्या विरोधात होणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियम मैदानात खेळवण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Bus Accident : जालन्यात भीषण अपघात, दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक

Maharashtra News Live Update: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाणीच पाणी

Blood Pressure by Age: तुमच्या वयोमानानुसार तुमचा BP किती प्रमाणात असला पाहिजे?

पत्नीचा अंगावर काटा आणणारा कट, पतीला मारले अन् मृतदेह बाथरूमखाली गाढला; पोलिसांच्या एका शंकेनं क्रूर कृत्य आले समोर

Masala Chai Recipe : 'मसाला चहा'ची सीक्रेट रेसिपी, एक घोट पिताच टपरीवरचा चहा विसरून जाल

SCROLL FOR NEXT