Team india
Team india  saam tv
क्रीडा | IPL

Ind Vs Sa 3rd ODI Match : टीम इंडियाने रचला इतिहास; दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत केला नवा पराक्रम

Vishal Gangurde

Ind Vs Sa 3rd ODI match : एक दिवसीय मालिकेच्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय क्रिकेट संघ तुफान फॉर्ममध्ये दिसला. भारतीय क्रिकेट संघाने (Team India) मालिकेच्या शेवटच्या एक दिवसीय सामन्यात ९९ धावांवर दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ गारद केला. त्यानंतर जिंकण्यासाठी मैदानात उतरेल्या भारतीय फलंदाजांनी जोरदार फलंदाजी केली. भारतीय फलंदाजांनी चांगल्या फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेवर जोरदार मात केली.

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या १०० धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला भारतीय फलंदाजांची जोरदार सुरूवात झाली. भारतीय संघाने ४.४ षटकात ३५ धावा झाल्या होत्या. शुभमन गिलने पाच चौकारांच्या सहाय्याने २४ धावा केल्या होत्या. भारताला पहिला झटका कर्णधार शिखर धवनच्या रुपाने मिळाला. धवनने अवघ्या ८ धावा केल्या. तर ईशान किशनच्या रुपाने भारताला दुसरा झटका मिळाला. ईशान किशान अवघ्या १० धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस-गिलने मैदानावर कमान सांभाळत आरामात सामना खिशात टाकला. टीम इंडियाने हा सामना जिंकल्यामुळे नवा इतिहास रचला आहे. भारताने हा सामना जिंकून वर्षभरात सर्वाधित एकदिवसीय सामने जिंकून ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने तिसऱ्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा पहिला गडी तंबूत परतवला. त्यानंतर आफ्रिकेचे एका पाठोपाठ एक फंलदाज बाद होत गेले. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ ६६ धावांवर तंबूत परतला होता. भारताकडून कुलदीप यादवने ४.१ षटकात १८ धावा देत सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि शाहबाज नदिमने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Roti At Night: रात्रीच्या वेळी चपाती खाण्याचे तोटे काय

Iran News: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, शोध आणि बचाव कार्य सुरू

Eknath Shinde News| एकनाथ शिंदे,श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या बंद दाराआड चर्चा!

Today's Marathi News Live: या वर्षी रायगडावर साजरा होणार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटही कडू; ४ विकेट राखून हैदराबादचा विजय,Points Table मध्ये राजस्थानची घसरण

SCROLL FOR NEXT