IND vs PAK Final saam tv
Sports

IND vs PAK Final: पाकिस्तान चारीमुंड्या चीत! भारताचा सुवर्णवेध, अभिषेक-तिलक चमकले

IND vs PAK Asian Games final 2026: एशियन गेम्स 2026 च्या पुरुष क्रिकेट फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा 19 धावांनी पराभव करत सुवर्णपदक जिंकले.

Surabhi Jayashree Jagdish

एशियन गेम्स 2026 मधील पुरुषांच्या क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करत गोल्ड मेडलवर नाव कोरलंय. भारताने प्रथम फलंदाजी करताना 211/6 रन्सचा मोठा स्कोअर उभारला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवत टीमला शानदार विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केलीये. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 19 रन्सने विजय मिळवला आहे.

टीम इंडियाची फलंदाजी

भारतीय टीमला वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांनी तुफानी सुरुवात करून दिली. मात्र वैभवला मोठी खेळी करता आली नाही. वैभवने 2 सिक्सच्या मदतीने 9 चेंडूंत 15 ऱन्स केले. त्याच्या बाद होण्याच्या वेळी भारताचा स्कोर 28/1 होती. त्यानंतर संजू सॅमसनही या सामन्यात मोठी खेळी करू शकला नाही. तो अवघ्या 2 धावांवर अहमद दानियालच्या गोलंदाजीवर बाद झाला.

दरम्यान, भारतीय ओपनर अभिषेक शर्माने अवघ्या 20 चेंडूंत अर्धशतक झळकावलं. या फॉरमॅटमधील त्याचे हे 13वे अर्धशतक ठरलं. त्यानंतर काही वेळातच अभिषेकचा डाव 61 धावांवर संपुष्टात आला. त्याने 28 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार आणि 7 षटकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेट 217 पेक्षा अधिक राहिला. अराफात मिन्हासने अभिषेकला बाद केले आणि उस्मान खानने त्याला यष्टीचीत केले.

भारताला चौथा धक्का ईशान किशनच्या रूपाने बसला. अराफात मिन्हासने त्याला बोल्ड केलं. ईशानने 18 चेंडूंत 20 धावा केल्या, ज्यात 3 चौकारांचा समावेश होता. त्यानंतर अबरार अहमदने श्रेयस अय्यरला कॅचआऊट केलं. श्रेयस 24 चेंडूंत 21 रन्स करून माघारी परतला. त्याच्या खेळीत 2 चौकारांचा समावेश होता. श्रेयस हा भारताकडून बाद होणारा पाचवा फलंदाज ठरला.

अंतिम षटकांमध्ये शिवम दुबे आणि तिलक वर्माने भारताच्या स्कोरला चांगला वेग दिला. दुबेने 15 चेंडूंत 27 धावा करताना 2 चौकार आणि 2 षटकार लगावले. दुसरीकडे, तिलक वर्माने आक्रमक फलंदाजी करताना अवघ्या 22 चेंडूंत नाबाद 51 धावांची शानदार खेळी केली.

भारताने जिंकले १९वं गोल्ड मेडल

यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट टीमने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले होते. आता पुरुष संघानेही पाकिस्तानचा १९ धावांनी पराभव करत सुवर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे क्रिकेटमधील महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांची सुवर्णपदकं पुन्हा एकदा भारताच्या खात्यात जमा झाली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exercise For Healthy Heart: हेल्दी हार्टसाठी रोज किती वेळ व्यायाम केला पाहिजे? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: मराठवाडा पदवीधर मतदार यादीत उद्धव ठाकरेंच्या नावावर आक्षेपार्ह मजकूर? ठाकरे गटाची तक्रार

Dinner Skip: १५ दिवस डिनर टाळलं तर वजन खरंच कमी होतं का? शरीरात होणारे ७ बदल जाणून घ्या

PF Rules 2026 : PF चे नियम बदलले! १५ ऑक्टोबरपासून CTC आणि टेक-होम सॅलरीत मोठे फेरबदल, पाहा तुम्हाला फायदा होणार की तोटा?

5 Best Anarkali Sets: गरब्यासाठी घागरा- चोळी नाही? मग आजच खरेदी करा घेरदार अनारकली सूट

SCROLL FOR NEXT