World Cup Saam tv
Sports

World Cup: अखेर २०१९ चा बदला घेतला! शमीच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंड ढेर; तिसऱ्या विश्वचषकापासून टीम इंडिया एक पाऊल दूर

World Cup 2023: बुधवारी झालेल्या हाय व्हॉल्टेज सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर ७० धावांनी विजय मिळवला.

Vishal Gangurde

India vs New Zealand Semi Final 1st 2023: 

आयसीसीच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने मोठ्या दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी झालेल्या हाय व्हॉल्टेज सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर ७० धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने सामना जिंकत २०१९ साली विश्वचषकात झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला आहे. (Latest Marathi News)

२०१९ विश्वचषकातील सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने विराट कोहलीच्या नेतृत्वातील टीम इंडियाचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला रोहित शर्माने घेतला आहे. आता सेमी फायनलमध्ये विजय मिळवल्याने टीम इंडिया विश्वचषक जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.

विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाची भिडत ही ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेशी होईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विश्वचषक स्पर्धेची दुसरी सेमी फायनल आज म्हणजे गुरुवारी (१६ नोव्हेंबर) खेळण्यात येणार आहे. दुसरी सेमी फायनल दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. दुसऱ्या सेमी फायनलचा सामना ईडन गार्डन्सवर होणार आहे. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये होणाऱ्या विजेत्या संघाचा सामना हा भारताशी होणार आहे.

कोहली आणि अय्यरची तुफानी खेळी

टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या फलंदाजांनी किवींच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. टीम इंडियाने ४ गडी गमावून ३९७ धावा केल्या.

टीम इंडियासाठी विराट कोहलीने ११७ धावांची खेळी खेळली. तर श्रेयस अय्यरने १०५ धावांची खेळी खेळली. त्यासोबत शुभमनने नाबाद ९० धावा, तर केएल राहुलने नाबाद ३९ धावा चोपल्या. संघाचा कर्णधार रोहितने ४७ धावांची खेळी खेळली. तर किवींसाठी टीम साऊदीने टीम इंडियाचे तीन गडी बाद केले.

शमीच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंड ढेर

३९८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ ३२७ धावांवर ढेपाळला. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ ७० धावांनी पराभूत झाला. न्यूझीलंडच्या मिचेलने १३४ धावांची खेळी खेळली. तर कर्णधार केन व्हिलियमसनने ६९ धावा केल्या. तर फिलिप्सने ४१ धावा काढल्या. तर शमीने टीम इंडियासाठी ७ गडी बाद केले. बुमराह, सिराज आणि कुलदीप यादवने प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

विक्रमादित्य 'विराट'

सेमी फायनलच्या सामन्यात विराट कोहलीने ५० वे शतक ठोकलं. विराट सेमी फायनलमध्ये शतक ठोकून वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा खेळाडू ठरला आहे.

विराटने सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा विक्रम मोडला. त्याचबोरबर टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये सर्वाधिक धावसंख्या उभारण्याचा विक्रमही नावावर केला आहे. याआधी सेमी फायनलमध्ये भारताने ३२८/७ (५०) इतकी धावसंख्या उभारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

SCROLL FOR NEXT