क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये म्हणजेच, कसोटी, वनडे आणि टी २० सामन्यांत जगातील तगड्या संघांना कधीही, कुठेही पाणी पाजणाऱ्या भारतीय संघाची गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दिसून येणारी सगळ्यात कमकुवत बाजू ठरलेल्या गोलंदाजीची धार आता आणखी वाढणार आहे. पब्लिक डिमांड म्हणजेच, क्रिकेट तज्ज्ञांपासून आजी-माजी खेळाडू ते चाहत्यांमधून ज्याची मागणी केली जात होती, त्या भुवनेश्वर कुमारची भारतीय टी २० संघात कमबॅक झालं आहे. तब्बल चार वर्षांनी भुवनेश्वर भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. दुसरीकडे, जसप्रीत बुमराह याला संघात स्थान देण्यात आले नाही. त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भारतीय संघ याच महिन्यात न्यूझीलंडच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये मालिका खेळवल्या जाणार आहेत. त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने मंगळवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी २० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.
अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला संघात स्थान देण्यात आले आहे. चार वर्षांनी भुवनेश्वर भारतीय संघाकडून खेळणार आहे. भारतासाठी त्यानं अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर २०२२ मध्ये खेळला होता. युवा सलामीवीर आणि स्फोटक फलंदाज अशी ओळख असलेला वैभव सूर्यवंशी याच्यावर टीम इंडियाच्या व्यवस्थापनाने पुन्हा विश्वास दाखवला आहे.
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन, तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, नीतीश कुमार रेड्डी, नमन धीर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.