Hockey India team For World Cup 2026 social media
Sports

Hockey World Cup 2026 : वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा; भरवशाच्या खेळाडूवर नेतृत्वाची धुरा, कुणाला संधी, कुणाला वगळलं?

india hockey world cup 2026 squad : पुढील महिन्यात होणाऱ्या FIH हॉकी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाने २० खेळाडूंच्या चमूची घोषणा केली. स्टार डिफेंडर हरमनप्रीत सिंग याच्याकडे कर्णधारपद दिलं आहे. तर अनुभवी खेळाडू मनप्रीत सिंग हा मिडफील्डची जबाबदारी सांभाळणार आहे.

Nandkumar Joshi

५० वर्षांपासून भारतीय हॉकी संघाला वर्ल्डकप जेतेपदाची प्रतीक्षा आहे. हे स्वप्न उराशी बाळगून भारताचा संघ मैदानात उतरणार आहे. पुढील महिन्यात हॉकी वर्ल्डकप स्पर्धा रंगणार आहे. १९७५ मध्ये वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या भारतीय संघाकडे इतिहास घडवण्याची नामी संधी आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या हॉकी वर्ल्डकप स्पर्धेसाठी हॉकी इंडियानं आज, २१ जुलैला २० सदस्यीय संघाची घोषणा केली. अनुभवी डिफेंडर आणि स्टार ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंग याच्याकडे कर्णधारपदाची धुरा दिली आहे.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला कांस्य पदक जिंकून देणाऱ्या हरमनप्रीतकडून यावेळी वर्ल्डकप स्पर्धेत अवघ्या देशाला प्रचंड अपेक्षा आहेत. तर संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असलेला मनप्रीत सिंग हा मिडफील्डची जबाबदारी सांभाळणार आहे. याशिवाय मैदानात युवा खेळाडूंसह अनुभवाचा तालमेळ त्याला बसवावा लागणार आहे.

अलीकडेच झालेल्या एफआयएच प्रो लीगमध्ये भारतीय हॉकी संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नव्हती. भारतीय संघाने १६ पैकी ४ सामन्यांत विजय मिळवला. तर पाच सामने अनिर्णित राहिले. तर सात लढतींमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. आता हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत या निराशाजनक कामगिरीचा फारसा विचार न करता चांगली कामगिरी करण्यावर भारतीय संघाचा भर असणार आहे.

वर्ल्डकपसाठी निवडलेल्या २० सदस्यीय संघात प्रो लीग स्क्वाडमधील चार खेळाडूंना स्थान मिळालेलं नाही. डिफेंडर अमनदीप लाकडा, मिडफील्डर राजकुमार पाल, राबीचंद्र सिंह मोइरांगथेम आणि फॉरवर्ड सेल्व्हम कार्थी यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी संघनिवडीवर भरवसा व्यक्त करतानाच, हा अनुभवी आणि युवा खेळाडूंचं उत्तम मिश्रण आहे. या संघात नावाच्या आधारे नाही, तर अलीकडेच केलेल्या चांगल्या कामगिरीच्या आधारे खेळाडूंना स्थान मिळालेलं आहे, असे ते म्हणाले.

मिडफील्डमध्ये मनप्रीत सांभाळणार जबाबदारी

गोलकीपिंगची जबाबदारी मोहित एचएस आणि सूरज करकेर यांच्याकडे असेल. डिफेन्समध्ये कर्णधार हरमनप्रीतसह जरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंह, संजय, सुमित आणि यशदीप सिवाच याचा समावेश आहे. मिडफील्डमध्ये मनप्रीत सिंग, हार्दिक सिंह, विवेक सागर प्रसाद, नीलकांत शर्मा, राजिंदर सिंग आणि आदित्य अर्जुन लालगे खेळणार आहेत. तर मनदीप सिंग, दिलप्रीत सिंग, अभिषेक, सुखजीत सिंग आणि शिलानंद लाकडा यांच्यावर अटॅकिंगची जबाबदारी असेल.

वर्ल्डकपसाठी भारतीय संघ

गोलकीपर - मोहित एचएस, सूरज करकेर

डिफेंडर - जरमनप्रीत सिंग, हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमित, यशदीप सिवाच

मिडफील्डर - राजिंदर सिंग, आदित्य अर्जुन लालगे, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, नीलाकांता शर्मा, विवेक सागर प्रसाद

फॉरवर्ड - दिलप्रीत सिंग, शिलानंद लाकडा, सुखजीत सिंग, मनदीप सिंग, अभिषेक.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावरील दरोडाच्या सूत्रधार बीडमधून जेरबंद

Heart failure symptoms: हार्ट फेल्युअर होण्याच्या काही तासांपूर्वी दिसतात हे 5 बदल, तिसरं लक्षण दिसताच डॉक्टरकडे धावा

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोनं झालं स्वस्त, 10 तोळा सोन्यात 14,700 रुपयांची घसरण; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

भीषण अपघात! मिनीबस अन् ट्रकची जोरदार धडक; ५ जणांचा जागीच मृत्यू, ७ जण मृत्यूशी देतायत झुंज

LPG Price September : 1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांसाठी मोठे बदल! सिलेंडरच्या दरांपासून e-KYC पर्यंत जाणून घ्या अपडेट्स

SCROLL FOR NEXT