richa ghosh twitter
Sports

IND W vs PAK W: फ्लाईंग Richa Ghosh! वाऱ्याच्या वेगाने डाईव्ह मारत घेतला भन्नाट कॅच; VIDE0

Richa Ghosh Catch News: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात ऋचा घोषने शानदार झेल घेतला आहे.

Ankush Dhavre

दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार सुरु आहे. पहिला सामना गमावलेल्या भारतीय संघासाठी हा सामना करो या मरो सामना असणार आहे. दरम्यान भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करुन पाकिस्तानच्या गोलंदाजांना लागोपाठ मोठे धक्के दिले आहेत.

पाकिस्तानची कर्णधार फातिमा शेखला माघारी धाडण्यासाठी यष्टीरक्षक ऋचा घोषने अविश्वसनीय झेल घेतला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

भारतीय संघासाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या सामन्यात पाकिस्तानत्या कर्णधाराने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवत संघाला चांगली सुरुवात करुन दिली.

भारतीय संघाकडून रेणुका सिंगने पहिल्याच षटकात पाकिस्तानला मोठा धक्का दिला. तिने सलामीवीर फलंदाज फेरोजाला शून्यावर बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर १४ व्या षटकात आशाने पाकिस्तानची कर्णधार फातिमाला पॅव्हेलियनची वाट दाखवली.

तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरु असताना १४ वे षटक टाकण्यासाठी आशा गोलंदाजीला आली. लेग स्पिन गोलंदाजी करणाऱ्या आशाचा चेंडू पडताच पाकिस्तानच्या फलंदाजने स्विप करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती चेंडूपासून दूर राहिली. तिचा हा चेंडू तिच्या बॅटपासून दूर राहिला. त्यावेळी चेंडू बॅटची कडा घेत आणखी दूर जात होता. मात्र यष्टीरक्षण करत असलेल्या ऋचा घोषने ०.४४ सेंकदात डाईव्ह मारत शानदार झेल घेतला. तिने घेतलेल्या या झेलचं जोरदार कौतुक होतंय.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय संघाची प्लेइंग ११: स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, ऋचा घोष (यष्टीरक्षक), दिप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, एस सजना, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकुर सिंग

पाकिस्तान महिला संघाची प्लेइंग ११: मुनीबा अली (यष्टीरक्षक), गुल फिरोज़ा, सिदरा अमीन, निदा डार, आलिया रियाज, ओमेमा सोहेल, फातिमा सना (कर्णधार), तुबा हसन, नशरा संधू, सैयदा अरूब शाह, सादीया इकबाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT