team india  twitter
Sports

IND W vs AUS W: टीम इंडियासाठी 'करो या मरो'ची लढत! AUS विरुद्धचा सामना गमावल्यास कसं असेल सेमीफायनलचं समीकरण?

Team India Qualification Scenario, ICC Womens T20 World Cup 2024: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील अतिशय महत्वाचा सामना रंगणार आहे.

Ankush Dhavre

आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचं सेमीफायनलमध्ये जाण्याचं समीकरण अजूनही तळ्यात मळ्यात आहे. न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाने पुढील १ सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव केला आहे.

येत्या रविवारी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये जायचं असेल, तर कुठल्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. मात्र पराभव झाल्यास सेमीफायनलमध्ये जाणं कठीण होईल. जर भारतीय संघाचा पराभव झाला, तर कसं असेल समीकरण? जाणून घ्या.

भारतीय संघ ग्रुप ए मध्ये आहे. या ग्रुपमध्ये ३ पैकी ३ सामने जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. ऑस्ट्रेलियाने जर भारतीय संघाला पराभूत केलं, तर ऑस्ट्रेलियाचा संघ सेमीफायनलमधील स्थान पक्क होईल. तर दुसरीकडे भारतीय संघाला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ४ गुणांची कमाई केली आहे. मात्र भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा मागे आहे.

भारतीय संघाचा पराभव झाला, तर?

भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, तर भारतीय संघाचं टेन्शन वाढणार आहे. असं झाल्यास भारतीय संघाला पाकिस्तानवर अवलंबून राहावं लागेल. भारतीय संघाला प्रार्थना करावी लागेल की, न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानला पराभूत करेल. पाकिस्तानचा १ सामना शिल्लक आहे. तर श्रीलंकेचा संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

भारतीय संघासाठी केवळ जिंकणं महत्वाचं नसणार आहे. भारतीय संघाला नेट रनरेटच्या बाबतीतही ऑस्ट्रेलियाला मागे सोडावं लागणार आहे. त्यासाठी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाला कुठल्याही परिस्थितीत मोठ्या फरकाने पराभूत करावं लागणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये अतितटीची लढत पाहायला मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यातील ७५ हजार युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार - लोढा

Farmer : आठ महिन्यात ११८३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; पश्चिम विदर्भात सर्वात मोठा आकडा आला समोर

Satara Gadget: पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी खुशखबर, हैदराबादनंतर सातारा गॅझेट्ससाठी हालचालींना वेग

Thar Car Accident: महिलेने नवी कोरी थार घेतली, लिंबूवरून नेली अन् घडलं भयंकर, VIDEO होतोय व्हायरल

'Bigg Boss 19'च्या तिसऱ्या आठवड्यात होणार डबल एलिमिनेशन? 4 सदस्य झाले नॉमिनेट

SCROLL FOR NEXT