Ind W Vs Aus W x
Sports

Ind W Vs Aus W : टीम इंडियाचा दारूण पराभव, भारताने सामना ८ विकेट्सने गमावला

Ind W Vs Aus W Highlights : भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला सुरु असताना दुसऱ्या बाजूला महिला क्रिकेट संघाचा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला गेला.

Yash Shirke

  • भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत २८१ धावा केल्या.

  • ऑस्ट्रेलियाने फक्त २ गडी गमावत २८२ धावांचे लक्ष्य सहज गाठले.

  • टीम इंडिया मालिकेतील पहिला सामना ८ विकेट्सने पराभूत झाली.

Ind W Vs Aus W News : वर्ल्डकप २०२५ पूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखत भारताचा पराभव केला आणि मालिकेमध्ये आघाडी घेतली.

टॉस जिंकून भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी केली. भारतीय संघाने ५० ओव्हर्समध्ये ७ गडी गमावत २८१ धावा केल्या. स्मृती मानधनाने ६३ चेंडूत ५८ धावा केल्या. प्रतिका रावलने ९६ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. रिचा घोषने २० चेंडूत २५ धावा केल्या, तर दीप्ती शर्मा १६ चेंडूत २० धावा करत नाबाद राहिली.य हरलीन देओलने ५७ चेंडूत ५४ धावा करत संघाची धावसंख्या २८० पार नेली.

ऑस्ट्रेलियाने फक्त ४४.१ ओव्हर्समध्ये फक्त २ गडी गमावून २८२ धावांचे लक्ष गाठले. सलामीवीर फोबी लिचफिल्डने दमदार खेळी करत ८० चेंडूंत ८८ धावा केल्या. कर्णधार अ‍ॅलिसा हीलीने २३ चेंडूत २७ धावा करून संघाला चांगली सुरुवात दिली. अ‍ॅलिस पेरीनेही ३८ चेंडूत ३० धावांचे योगदान दिले, परंतु ती रिटायर्ड हर्ट झाली आणि पॅव्हेलियनमध्ये परतली. बेथ मूनीने ७४ चेंडूत नाबाद ७७ धावा आणि अ‍ॅनाबेल सदरलँडने ५१ चेंडूत नाबाद ५४ धावा करत ऑस्ट्रेलिया संघाचा विजय पक्का केला.

ऑस्ट्रेलियाकडून मेगन शटने २ गडी बाद केले. किम गार्थ, अ‍ॅनाबेल सदरलँड, अलाना किंग आणि ताहलिया मॅकग्रा यांनी प्रत्येकी १-१ असे ४ गडी बाद केले. दुसऱ्या बाजूला, भारताकडून क्रांती गौर आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी १-१ अशा प्रकारे दोन विकेट्स घेतल्या. भारताचा संघ गोलंदाजीत मागे पडल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: परत येतो सांगत घराबाहेर पडला पण..., गावातील मंदिराजवळ आढळला मृतदेह; २२ वर्षीय तरुणासोबत काय घडलं?

Student Death : इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, काॅलेजच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं

IND vs PAK : भारताने पाकिस्तानला आशिया कपमध्ये पछाडले, ७ गडी राखत मिळवला सहज विजय

Winter 2025 : गरम कपडे तयार ठेवा! यंदा हाडं गोठवणारी थंडी पडणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics: सगळ्यांनी एकनाथ शिंदे बनून काम करा, शिवसेनेकडून सर्व नेत्यांना महत्वाच्या सूचना

SCROLL FOR NEXT