IND vs ZIM 3rd ODI Saam Tv
Sports

IND vs ZIM 3rd ODI: दीपक चहर शेवटचा सामना खेळणार की नाही? नवी अपडेट आली समोर

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना होणार आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: भारत (Team India) आणि झिम्बाब्वे यांच्यात एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना होणार आहे. टीम इंडियाने पहिला सामना जिंकून मालिकेवर आधीच आघाडी घेतली आहे. आता तिसऱ्या वनडेत भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतो. दीपक चहर पहिला एकदिवसीय सामना खेळला होता, पण दुसऱ्या सामन्यात त्याच्या जागी शार्दुल ठाकूर याला संधी देण्यात आली होती. आता दीपकचहरला पुन्हा दुखापत झालेली नाही. तो बरा असून तिसरी वनडे खेळणार असल्याच्या बातम्या येत आहेत. वर्कलोड मॅनेजमेंटचा भाग म्हणून त्याला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विश्रांती देण्यात आली होती.

“दीपक चहर सध्या ठीक आहे. खबरदारी म्हणून दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. एवढ्या प्रदीर्घ दुखापतीनंतर त्याने घाई करावी असे संघ व्यवस्थापन आणि फिजिओला वाटत नव्हते. त्याला विश्रांतीची गरज आहे. तो तिसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या (BCCI) एका अधिकाऱ्याने दिली आहे.

दीपक चहर झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळला होता आणि त्याने ७ षटके टाकले होते आणि तीन विकेट घेतल्या. पहिल्या वनडेत त्याने फारसे क्षेत्ररक्षण केले नाही. तेव्हापासून तो जखमी झाला. यानंतर त्याला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही विश्रांती देण्यात आली. आता भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT