why Suryakumar Yadav video is viral : करो या मरोच्या सामन्यात संजू सॅमसन याने ९७ धावांची नाबाद खेळी करत भारताला सेमी फायनलचे तिकिट मिळवून दिले. सामन्यानंतर बोलताना संजू म्हणाला देशासाठी अशीच खेळी करण्यासाठी मी वाट पाहत होतो. संजू सॅमसन याचं मैदानात आणि बाहेरही कौतुक होत आहे. पण संजू सॅमसन याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा फ्लॉप जात होते, तरीही संजूला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळत नव्हते. सूर्यकुमार यादव आणि टीम मॅनेजमेंटला सूर्याला घ्यावं लागलं.
एका पत्रकाराने सूर्याला संजूला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळेल का? असा सवाल विचारला होता, त्यावेळी सूर्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली होती. सूर्यकुमार यादव याने या प्रश्नावर हसून उत्तर दिले होते. अभिषेक शर्माला बॅक करणं गरजेचं आहेच, पण संजू सारख्या खेळाडूंना संधी कधी मिळणार? असा सवाल आता विचारला जातोय. सूर्यकुमार यादवचा तो व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे. कोलकात्यामधील सामन्यानंतर नेटकऱ्यांमध्ये या व्हिडिओची जोरदार चर्चा आहे. सूर्यकुमार यादव याला ट्रोल केले जात आहे.
व्हायरल व्हिडिओत नेमकं काय?
अभिषेक शर्मा शर्मा फ्लॉप होत आहे, तर त्याच्या जागी संजू सॅमसन याला संधी मिळेल का? असा सवाल सूर्यकुमार यादव याला गेल्या आठवड्यात एका पत्रकराने विचारला होता. या प्रश्नांचे उत्तर देताना सूर्यकुमार यादवने हसत हसत कुणाच्या जागेवर खेळवायचं असा सवाल केला. संजू सॅमसनसाठी अभिषेक शर्मा, तिलक वर्मा यांना बाहेर बसवायचे का? असे तो हसत हसत म्हणाला होता. संजू सॅमसन याला संघात स्थान नाही, असे सांगणारा सूर्या कोलकात्यामधील सामन्यानंतर त्याला मान देताना दिसला. संजूच्या वादळी फलंदाजीनंतर सूर्यकुमार यादवचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला. पाहा व्हिडिओ...
अखेर संजू सॅमसन याला संधी मिळाली?
मागील २ वर्षांपासून टी२० मध्ये संजू सॅमसन सलामीसाठी पहिली पसंती होता. पण विश्वचषकाआधी संजूच्या ऐवजी शुभमन गिल याला संधी दिली गेली. पण तो कामगिरीत सातत्य राखू शकला नाही. विश्वचषकाच्या संघात संजूसोबत इशान किशन याला संधी देण्यात आली. इशान किशन याने संधीचा फायदा घेत विश्वचषकाआधी झालेल्या मालिकेत धावांचा पाऊस पाडला. त्यामुळे इशान किशन आणि अभिषेक शर्मा ही जोडी विश्वचषकात सलामी करताना दिसली. संजू सॅमसन याला पुन्हा डावलण्यात आले होते. पण संजू सॅमसन फक्त संधीची वाट पाहत राहिला. अखेर त्याला चेन्नईमध्ये संधी मिळाली. चेन्नईमध्ये संजू सॅमसन याने छोटेखानी खेळी करत आपल्यातील प्रतिभा दाखवून दिली. त्यानंतर इडन गार्डनच्या मैदानात संजू सॅमसन याने नाबाद ९७ धावांची खेळी करत टीम इंडियाला उपांत्य फेरीचे तिकिट मिळवून दिले. संजूच्या विस्फोटक फलंदाजीनंतर सूर्यकुमार यादव याला ट्रोल करण्यात येत आहे. त्याचा तो व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.