IND vs WI
IND vs WI Saam TV
क्रीडा | IPL

IND vs WI: ऐतिहासीक एकदिवसीय मालिका प्रेक्षकांविनाच...

वृत्तसंस्था

भारत आणि वेस्ट इंडिज (WI vs IND) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. त्यातला पहिला सामना 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे. कोरोनाच्या (Corona) वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने (BCCI) आधीच सांगितले होते की, सर्व सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवण्यात येतील. त्याचबरोबर टी-20 मालिकेतील सर्व सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवले जातील. कोलकात्यातील चाहत्यांना स्टेडियममध्ये येऊन हा सामना पाहता येणार असून, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या सामन्यांच्या संबंधित एक बातमी समोर आली आहे.

6 फेब्रुवारीला होणारा सामना टीम इंडियासाठी खूप खास असणार आहे. कारण हा संघाचा 1000 वा एकदिवसीय सामना असणार आहे. आणि टीम इंडिया (Team India) हा आकडा गाठणारा जगातील पहिला संघ बनणार आहे.

मात्र, चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे, ती म्हणजे स्टेडियममधून हा ऐतिहासिक सामना थेट पाहण्याचा विचार करत होते. त्यांच्या आनंदावर पाणी फिरले आहे कारण स्टेडियम प्रशासनाने जाहीर केले आहे की हा सामना प्रेक्षकांविनाच खेळवला जाणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणारे तीनही सामने प्रेक्षकांविनाच होणार आहे. त्यासंबंधीचं अधिकृत ट्विटही करण्यात आले आहे.

तिन्ही एकदिवसीय सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवले जातील. जे दुपारी 1.30 वाजल्यापासून सुरू होतील.

- पहिला सामना - 6 फेब्रुवारी 2022

- दुसरा सामना- 9 फेब्रुवारी 2022

- तिसरा सामना - 11 फेब्रुवारी 2022

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, लोकेश राहुल, ऋषभ पंत, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, कुलदिप यादव, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान.

वेस्ट-इंडिज संघ

किरॉन पोलार्ड (कर्णधार), डॅरेन ब्राव्हो, शमारह ब्रूक्स, ब्रँडन किंग, फॅबियन ऍलन, एनक्रुमाह बनर, जेसन होल्डर, शाई होप, निकोलस पूरन, एकील होसेन, अल्झारी जोसेफ, केमार रोच, रोमॅरियो शेफर्ड, ओडिन स्मिथ, हेडन वॉल्श.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: बारामतीत अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

Weight Loss Mistakes : एक्सरसाइज अन् व्यायाम करूनही वजन काही कमी होईना? मग जाणून घ्या जाड होण्यामागचं कारण

Sangli Loksabha News: सांगलीचा 'भावी खासदार' कोण? बुलेट, युनिकॉर्नची पैज आली अंगलट; दोघांवर गुन्हा दाखल

ATM Crime : चोरट्यांनी एटीएम मशीनच लांबविली; चोरट्यांनी अगोदर फोडला सीसीटीव्ही

Health Tips: मसाल्यामधील धणे जीरे खाण्याचे आश्चर्यचकित करणारे फायदे

SCROLL FOR NEXT