team india saam tv
Sports

IND VS WI 3rd ODI Playing 11: टीम इंडियाचा प्रयोग फसला; तिसऱ्या वनडेत रोहित 'या' खेळाडूंना देणार नारळ, पाहा प्लेइंग ११

India vs West Indies 3rd ODI: दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात काही महत्वाचे बदल केले जाऊ शकतात.

Ankush Dhavre

Team India Playing 11 For IND vs WI 3rd ODI: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघामध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात वेस्टइंडीज संघाने दमदार कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले होते.

सध्या मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. मालिकेतील निर्णायक सामना १ ऑगस्ट रोजी त्रिनिदादच्या मैदानावर रंगणार आहे. दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात काही महत्वाचे बदल केले जाऊ शकतात.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या वनडेत विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या वनडेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती दिली गेली होती. मात्र अंतिम सामना जिंकण्यासाठी या दोघांचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो.

संजू सॅमसनला विश्रांती...

संजू सॅमसनला विराट कोहलीच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्याने १९ चेंडूंचा सामना करत अवघ्या ९ धावा केल्या होत्या. त्यामुळे विराट कोहलीचं पुनरागमन होताच संजू सॅमसनला बाहेर केलं जाऊ शकतं. (Latest sports updates)

अक्षर पटेल..

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला देखील प्लेइंग ११ मधून बाहेर केलं जाऊ शकतं. रविंद्र जडेजा, हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर हे गोलंदाजीसह फलंदाजीतही योगदान देत आहेत. त्यामुळे अक्षर पटेलला संघात स्थान मिळणं कठीण आहे.

उमरान मलिक..

वेगवान गोलंदाज उमरान मलिकला देखील हवी तशी कामगिरी करता आली नाही. तो दोन्ही सामन्यांमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. भन्नाट गतीने गोलंदाजी करण्यासाठी ओळखल्या जाणारा उमरान मलिकला एकही विकेट घेता आला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rasam Rice Recipe: घरच्या घरी टेस्टी साऊथ इंडियन स्टाईल रसम राईस नक्की बनवा, वाचा सोपी रेसिपी

Raigad Fort : शिवरायांच्या स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार, 'रायगड'बद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितेय का?

Maharashtra News Live Update: मेळघाटातील भुमकाबाबा मंदिर अखेर दर्शनासाठी खुले

Gaurav More Wedding : 'फिल्टरपाड्याचा बच्चन' चढला बोहल्यावर; गौरव मोरेने गुपचूप बांधली लग्नगाठ, बायकोसोबतचा पहिला फोटो आला समोर

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट; आणखी एक महिला अधिकारी रडारवर, प्रशासनात खळबळ

SCROLL FOR NEXT