rohit sharma saam tv
Sports

IND vs WI 3rd ODI: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा पराभव निश्चित? चिंता वाढवणारी बातमी आली समोर

Shai Hope Record Against India: या सामन्यापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे.

Ankush Dhavre

India vs West Indies 3rd ODI: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघामध्ये सुरू असलेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना १ ऑगस्ट रोची रंगणार आहे. भारतीय संघाने पहिल्या वनडेत विजय मिळवला होता. तर दुसऱ्या वनडेत वेस्टइंडीज संघाने दमदार कमबॅक करत विजय मिळवला होता.

सध्या ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. आता दोन्ही संघांना ही मालिका जिकंण्याची समान संधी आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे.

भारतीय संघ तिसरा सामना गमावणार?

वेस्टइंडीज संघाचा कर्णधार शाई होपने आतापर्यंत भारतीय संघाविरूद्ध खेळताना ८ वेळेस ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. त्याने भारतीय संघाविरूद्ध खेळताना सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.

त्यानंतर बांगलादेश संघाविरूद्ध खेळताना ७ वेळेस आणि श्रालंकेविरूद्ध खेळताना ६ वेळेस ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. ही आकडेवारी पाहून नक्कीच भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली असेल. त्याने आतापर्यंत भारतीय संघाविरूद्ध खेळताना ४९.१५ च्या सरासरीने ८९३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत.

भारतीय संघाला या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात देखील शाई होप हा भारतीय संघासाठी व्हिलन ठरला होता.

त्याने ८० चेंडूंचा सामना करत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६३ धावांची खेळी केली होती. तो सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यातही भारतीय संघाला शाई होपपासून सावध राहावं लागणार आहे. (Latest sports updates)

मालिका १-१ ने बरोबरीत..

या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ५ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात ईशान किशन आणि कुलदीप यादव भारतीय संघाच्या विजयाचे हिरो ठरले होते. तर दुसऱ्या सामन्यात वेस्टइंडीज संघाने दमदार कमबॅक करत ६ गडी राखून विजय मिळवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Fort : भक्कम दुहेरी तटबंदी अन् वैभवशाली इतिहास, सोलापूरमध्ये तलावाच्या काठी वसलाय भव्य किल्ला

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Accident: समृद्धी महामार्गावर भयंकर अपघात; पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले

Deool Band 2 Collection : स्वामी भक्तीत प्रेक्षक तल्लीन! प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २'चं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व, वाचा संडे कलेक्शन

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय अन्यथा...

SCROLL FOR NEXT