team india saam tv
Sports

IND vs WI 1st T20I: पहिल्या टी-२० सामन्यावर अस्मानी संकट? पाहा कसे असेल हवामान

IND VS WI Weather Report: या मालिकेतील पहिला सामना ३ ऑगस्ट रोजी त्रिनिदादच्या मैदानावर रंगणार आहे.

Ankush Dhavre

India vs West Indies 1st T20I: भारत विरूद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत २-१ ने विजय मिळवला आहे. ही मालिका झाल्यानंतर या दोन्ही संघामध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे.

या मालिकेतील पहिला सामना ३ ऑगस्ट रोजी त्रिनिदादच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी मोठी अपडेट समोर आली आहे.

कसं असेल हवामान?

भारत आणि वेस्टइंडीज या मालिकेतील तिसरा सामना त्रिनिदादच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होणार आहे. Accu weather च्या वृत्तानुसार सकाळी ११ वाजता ढगाळ वातावरण असेल, तर ३ वाजता वातावरण बदलेल.

तर पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळू शकतो.

भारतीय टी-२० संघाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे असणार आहे. तर सूर्यकुमार यादवकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या मालिकेसाठी तिलक वर्मा आणि अर्शदिप सिंगसारख्या युवा खेळाडूंना संधी दिली गेली आहे. तर उमरान मलिक,आवेश खान आणि मुकेश कुमारला देखील भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. (Latest sports updates)

टी-२० मालिकेसाठी असा आहे वेस्टइंडीजचा संघ :

रोमेन पॉवेल (कर्णधार), काइल मायर्स (उपकर्णधार), जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेज़, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, अल्जारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅकॉय, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशाने थॉमस.

टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

ईशान किशन (यष्टीरक्षक), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT