kuldeep yadav and ishan kishan team india
क्रीडा

IND vs WI: कुलदीपची भन्नाट गोलंदाजी अन् ईशानच्या क्लास फलंदाजी समोर विंडीजचं सरेंडर; टीम इंडियाचा मोठा विजय

IND vs WI Match Result: यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.

Ankush Dhavre

IND vs WI 1st ODI Result: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. मालिकेतील पहिला सामना बार्बाडोसच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी दमदार खेळ केल्याचे पाहायला मिळाले आहे.

पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने विजयी सलामी देत ५ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. (IND vs WI 1st ODI)

वेस्टइंडीजचा डाव ११४ धावांवर संपुष्टात..

भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी योग्य ठरवला. वेस्टइंडीज संघाचा डाव २३ षटकात अवघ्या ११४ धावांवर संपुष्टात आला. वेस्टइंडीज संघाकडून कर्णधार शाई होपने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली.

भारतीय संघाकडून कुलदीप यादवने ६ धावा खर्च करत सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर रविंद्र जडेजाने ३७ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. हार्दिक पंड्या, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी १-१ गडी बाद करण्यात यश आले. (Latest sports updates)

भारतीय संघाचा एकहाती विजय....

भारतीय संघाकडून रोहित शर्माऐवजी ईशान किशन डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आला होता. ईशान किशन आणि शुबमन गिलला हवी तशी सुरुवात करता आली नाही. शुबमन गिल अवघ्या ७ धावा करत माघारी परतला.

तर ईशान किशनने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने १९ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. शेवटी भारतीय संघाने ... षटकात दिलेले आव्हान पूर्ण करत हा सामना जिंकला. यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT