Ind vs SL ODI Series
Ind vs SL ODI Series  Saamtv
क्रीडा | IPL

Ind vs SL ODI Series: टेंन्शनचं संपल! Team India ला मिळाली जोडी नं 1, श्रीलंकेविरुद्ध ठोकल्यात खोऱ्याने धावा, विश्वचषकात उतरणार सलामीला

Gangappa Pujari

Ind vs SL ODI Series: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीसरा एकदिवसीय सामना काल पार पडला. शेवटच्या सामन्यात तब्बल 317 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघाचा हा विजय म्हणजे क्रिकेटच्या ईतिहासातील सर्वात मोठा वनडे विजय ठरला. या विजयासोबतच भारतीय संघाने तीन एकदिवसीय मालिकेत लंकेला व्हाईटवॉश दिला.

श्रीलंकेविरुद्धची (Srilanka) ही वनडे मालिका टीम इंडियासाठी आणखी एका कारणामुळे खूपच खास ठरली. हे कारण म्हणजे भारतीय संघाची डोकेदुखी ठरत असलेला सलामी जोडीचा प्रश्न आता मिटला आहे.

भारतीय संघाची सलामीची जोडी ही निवड समितीसाठी नेहमीच डोकेदुखी ठरत होती. संघात अनेक पर्याय उपलब्ध असल्याने रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार असा प्रश्न प्रत्येकवेळी उपस्थित होत होता. परंतु आता लंकेविरुद्ध धुवांधार फलंदाजी करत रोहित शर्मा आणि शुभमन गीलने ही चिंता मिटवली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या तीनही एकदिवसीय सामन्यांमध्ये शुभमन गिल आणि रोहित शर्माने सलामीला फलंदाजी केली. या जोडीने तीनही सामन्यांत संघाला चांगली सुरूवातही करुन दिली. गुवाहाटीमधील पहिल्या वनडे सामन्यात गिल आणि रोहितच्या जोडीने 143 धावांची शतकी भागीदारी केली.

कोलकात्तामधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोघांनी अवघ्या ३३ धावा जोडल्या. मात्र पुन्हा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात गिल आणि रोहितने 95 धावांची भागीदारी करत संघाला जोरदार सुरुवात करुन दिली.

श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत गिल आणि रोहित सर्वाधिक धावा ठोकणाऱ्यांच्या यादीतही अव्वल स्थानी होते. शुभमन गिलने 3 डावात 69 च्या सरासरीने 207 धावा केल्या ज्यामध्ये एका शतकाचा समावेश होता. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकावर विराट तर 3 डावात 147 धावा ठोकत रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

त्यामुळे रोहित (Rohit Sharma) आणि गिलच्या जोडीने दमदार सुरूवात करत सलामी जोडीचे टेंन्शन दुर केले आहे. त्यांचा हा फॉर्म असाच राहिलास आगामी विश्वचषकातही ते सलामीला येवू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Roti At Night: रात्रीच्या वेळी चपाती खाण्याचे तोटे काय

Iran News: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, शोध आणि बचाव कार्य सुरू

Eknath Shinde News| एकनाथ शिंदे,श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या बंद दाराआड चर्चा!

Today's Marathi News Live: या वर्षी रायगडावर साजरा होणार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटही कडू; ४ विकेट राखून हैदराबादचा विजय,Points Table मध्ये राजस्थानची घसरण

SCROLL FOR NEXT