IND Vs SL Live Telecast Saam Digital
क्रीडा

IND Vs SL Live Telecast : श्रीलंकेत बनले टीम इंडियाचे 3 कर्णधार; हार्दिक पांड्यांलाही मिळाली संधी

IND Vs SL T-20 Match : टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून 27 जुलैपासून पल्लेकेले येथे श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरू होत आहे. नवीन प्रशिक्षक आणि कर्णधाराच्या नेतृत्त्वात भारतीय संघ ही मालिका खेळणार आहे.

Sandeep Gawade

टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून 27 जुलैपासून पल्लेकेले येथे श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका सुरू होत आहे. या मैदानावरच तिन्ही सामने होणार आहेत. टीम इंडियाने संपर्ण मालिका जिंकण्याचा निर्धार केला आहे. टीम इंडियासाठी ही मालिका खास असणार आहे कारण संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक दोघंही नवीन आहेत. टी-20 संघाची कमान सूर्यकुमार यादवच्या हाती असणार आहे. तर मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर गौतम गंभीरची ही पहिली मालिका असणार आहे.

टीम इंडियाला श्रीलंकेत टी-20 मालिका जिंकायची आहे आणि त्यासाठी पल्लेकेलेच्या मैदानावर विशेष सराव सुरू करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाने गुरुवारी एक स्पेशल फिल्डिंग ड्रिल केली ज्यामध्ये टीमचे तीन कर्णधार बनवण्यात आले.गौतम गंभीरने सूर्यकुमार यादव, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्याला कर्णधार बनवलं होतं. प्रत्येक संघात 5-5 सदस्य होते. तिन्ही संघांनी आपली सर्वोत्तम कामगिरी केली पण शेवटी हार्दिक पंड्याचा संघाने बाजी मारली.

गुरुवारी पल्लेकेले येथे झालेल्या सराव दरम्यान हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यात बराचवेळ चर्चा सुरू होती. कर्णधारपदाच्या वादानंतर पहिल्यांदाच दोन्ही खेळाडू इतके दिवस बोलतांना दिसले. T20 विश्वचषक 2024 च्या विजयानंतर हार्दिक पांड्याकडे टी-20 संघाची जबाबदारी सोपवण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र त्याच्या फिटनेसचा विचार करून टीम इंडियाच्या व्यवस्थापनाने ही जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

SCROLL FOR NEXT