IND vs SL Live Streaming mint
Sports

IND vs SL Live Streaming: भारत आणि श्रीलंकेचा पहिला T20 सामना, जाणून घ्या कुठे पाहता येईल सामना?

IND vs SL Live Streaming: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका २७ जुलैपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा कर्णधार असेल.

Bharat Jadhav

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज होत आहे. या मालिकेतील सर्व सामने पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. दोन्ही संघ नव्या टी-20 कर्णधारासह मैदानात उतरणार आहेत. T20 विश्वचषक विजेतेपद पटकावल्यानंतर भारताचा स्टार फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्माने T20 फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर सूर्यकुमार यादवकडे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीय.

तर श्रीलंकेला T20 विश्वचषकात निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे वानिंदू हसरंगाने कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर श्रीलंकेच्या संघ आता चरित असलंका संघाचा नवा कर्णधार आहे.

दोन्ही संघासाठी महत्त्वाची आहे मालिका

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघासाठी ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. पुढील T२० विश्वचषक २०२६ मध्ये खेळवला जाईल. दोन्ही संघांना त्यांच्या नवीन खेळाडूंची चाचणी घ्यायची आहे. तर टीम इंडिया मालिकेतील पहिला सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे श्रीलंकेचा संघ सुरुवातीपासूनच बॅकफूटवर जाईल.

तर दुसरीकडे श्रीलंकेला या मालिकेत आपल्या दोन वेगवान गोलंदाजांची उणीव भासेल परंतु लंका प्रीमियर लीगमधील काही फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंसह श्रीलंकेचा संघ या तीन सामन्यांमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.

कधी, कुठे आणि कसे पाहता येईल सामना ?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील ३ सामन्यांच्या टी-20 मालिकेला शनिवारी २७ जुलै रोजी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होईल, तर दुसरा सामना २८जुलैला आणि तिसरा सामना ३० जुलै रोजी खेळवला जाईल. हे सामने सोनी स्पोर्ट्स १, सोनी स्पोर्ट्स १ एचडी, सोनी स्पोर्ट्स ३, सोनी स्पोर्ट्स ३ एचडी, सोनी स्पोर्ट्स ४, सोनी स्पोर्ट्स ४ एचडी, सोनी स्पोर्ट्स ५ , सोनी स्पोर्ट्स एचडी ५ चॅनेलवर सामने थेट प्रक्षेपित केले जातील. तर SonyLIV वरही हे सामने स्ट्रीम केले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT