Rohit Sharma Wicket Video twitter
क्रीडा

India vs Srilanka : पहिला बॉल चौकार अन् दुसऱ्याच बॉलवर दांडी गुल! रोहितचा स्टम्प उडून पडला ४ फुट लांब

Rohit Sharma Wicket Video: या सामन्यातील दुसऱ्याच चेंडूवर रोहित शर्माची दांडी गुल केली आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma Wicket Video:

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ३३ वा सामना सुरु आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला आहे. रोहित शर्मा अवघ्या ४ धावांवर तंबूत परतला आहे.

तर झाले असे की, नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आली होती. रोहित शर्मा स्ट्राईकवर तर श्रीलंकेकडून दिलशान गोलंदाजी करण्यासाठी आला होता.

रोहितने भारतीय संघाला दमदार सुरुवात करुन देत पहिलाच चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला. दुसऱ्या चेंडूवर दिलशानने कमबॅक करत रोहितच्या त्रिफळ्या उडवल्या. रोहित २ चेंडूंचा सामना करत अवघ्या ४ धावा करत तंबूत परतला . (Latest sports updates)

रोहितची कामगिरी..

आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा रोहित शर्मा वानखेडेच्या मैदानावर खेळताना हवी तशी कामगिरी करु शकलेला नाही. २०१५ मध्ये तो दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता.

या सामन्यात त्याने अवघ्या १६ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१७ मध्ये तो न्यूझीलंडविरुद्ध फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला होता. या सामन्यात त्याने २० धावा केल्या होत्या. तर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने केवळ १० धावा केल्या होत्या.

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT