tilak varma twitter
Sports

Tilak Varma Record: बंदे मे दम है..लागोपाठ शतकांसह तिलक वर्माने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड! बनला नंबर 1

India vs South Africa 4th T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या सामन्यात तिलक वर्माने मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

Ankush Dhavre

Tilak Varma Record News In Marathi: तिलक वर्माबद्दल बोलावं तितकं कमीच आहे. आधी संघात संधी मिळत नव्हती आणि आता संधी मिळाली तर सलग २ शतकं झळकावत संधीचं सोनं केलं. मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यातही त्याने शतक झळकावलं आहे. त्याने असा काही कारनामा करून दाखवला आहे, जो यापूर्वी कुठल्याच डावखुऱ्या फलंदाजाला करता आला नव्हता.

तिलक वर्माने (Tilak Varma) संजू सॅमसनसोबत मिळून रेकॉर्डब्रेक भागीदारी केली. यादरम्यान त्याने ४१ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्याने ६ चौकार आणि ९ षटकार खेचले. यासह तो टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग २ शतकं झळकावणारा डावखुरा फलंदाज ठरला आहे.

यापूर्वी हा कारनामा फ्रान्सच्या जी मॅकॉन, स्वित्झर्लंडच्या केरावा आणि दक्षिण आफ्रिकेच्या रिले रुसोवने केला आहे. मात्र भारताकडून सलग दुसरे शतक झळकावणारा तो केवळ दुसराच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी संजू सॅमसनने हा कारनामा करून दाखवला होता.

रेकॉर्डब्रेकिंग खेळी

तिलक वर्माची ही खेळी रेकॉर्डब्रेकिंग खेळी ठरली आहे. त्याला संघात स्थान मिळत नव्हतं. सूर्याने त्याला संघात स्थान दिलं आणि आपल्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधीही दिली. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला.

गेल्या सामन्यात त्याने तुफानी खेळी करत शतक झळकावलं होतं. या शतकी खेळीमुळे भारताने मोठी धावसंख्या उभारली. आता सलग दुसऱ्या सामन्यात त्याने दुसरं शतक झळकावलं. आपल्या या वादळी खेळीदरम्यान ९ चौकार आणि १० षटकार खेचले.

भारताचा मोठा विजय

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकअखेर १ गडी बाद २८३ धावा केल्या. भारताकडून संजू सॅमसनने १०९ आणि तिलक वर्माने १२० धावांची खेळी केली.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेला अवघ्या १४८ धावा करता आल्या. हा सामना भारतीय संघाने १३५ धावांनी जिंकला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT