rohit-sharma  saam tv news
Sports

Rohit Sharma News: क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का! रोहित शर्माबाबत समोर आली मोठी अपडेट

India vs South Africa T20I Series: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका सुरु आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे.

Ankush Dhavre

IND vs SA T20I Series:

ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका झाल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ ३ वनडे आणि ३ टी -२० सामन्यांची मालिका खेळताना दिसून येणार आहे. या मालिकेत भारतीय कर्णधार रोहित शर्मा खेळताना दिसून येणार का? असा प्रश्न उपस्थित होत असताना एक मोठी अपडेट समोर आली आहे. (Rohit Sharma Latest Update)

पीटीआयच्या वृत्तानुसार, रोहित शर्माने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी -२० मालिका खेळण्यास नकार दिला आहे. मात्र बीसीसीआय त्याचा नकार होकारमध्ये बदलण्याच्या प्रयत्नात आहे. रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी -२० मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करावं अशी बीसीसीआयचं म्हणणं आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी -२० सामने खेळायचे आहेत. टी -२० मालिकेतील पहिला सामना १० डिसेंबर रोजी डरबनमध्ये खेळवला जाणार आहे. तर दुसरा टी -२० सामना १२ डिसेंबर रोजी गकेबरहामध्ये रंगणार आहे.

मालिकेतील शेवटचा टी -२० सामना १४ डिसेंबर रोजी जोहान्सबर्गमध्ये रंगणार आहे. या मालिकेसाठीही भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज खेळाडू या मालिकेत खेळताना दिसणार का? हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. (Latest sports updates)

रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी टी -२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेत एकत्र खेळताना दिसून आली होती. त्यानंतर हे दोघेही टी -२० क्रिकेट खेळताना दिसून आलेले नाही. तर माध्यमातील वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, विराट कोहलीने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. कसोटी क्रिकेटवर आपलं लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जातं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Peanut Chutney Recipe : नाश्त्याला बनवा शेंगदाण्याची झणझणीत ओली चटणी; डोसा,वडा,इडलीची चव वाढवेल

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

Mozambique Accident : मोठी दुर्घटना, समुद्रात बोट उलटली, ३ भारतीयांचा मृत्यू, ५ बेपत्ता

Central Railway Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडताना वेळपत्रक वाचा

OPPO Find X9 Series: येणार येणार तुमचा फोटो भारीच येणार! दमदार कॅमेरावाला OPPO Find X9 Series च्या लॉन्चची तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT