india vs south africa google
Sports

WTC Points Table: दारुण पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का! WTC ची फायनल गाठणं कठीण

WTC News In Marathi: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

Ankush Dhavre

WTC Points Table Update, Ind vs Sa 1st Test:

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या सामन्यात भारताचा १ डाव आणि ३२ धावांनी पराभव झाला आहे.

भारतीय संघाला या पराभवाचा मोठा फटका बसला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. तर पाकिस्तानचा संघ या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा संघ पराभवाच्या वाटेवर आहे. जर पाकिस्तानने हा सामना गमावला तर पाकिस्तानचा संघही गुणतालिकेत खाली जाऊ शकतो. (WTC Points Table)

भारतीय संघाला पराभूत केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचे १२ गुण असून विजयाची सरासरी १०० टक्के इतकी आहे. तर २२ गुण आणि ६१.११ टक्के विजयाच्या सरासरीसह पाकिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. (Latest sports updates)

तिसऱ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंड संघाचे १२ गुण आहेत, तर ५० टक्के विजयाच्या सरासरीसह न्यूझीलंडचा संघ या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. २ सामन्यांमध्ये १२ गुण आणि ५० टक्के विजयाच्या सरासरीसह बांगलादेशचा संघ या यादीत चौथ्या स्थानी आहे. तर ३ सामन्यांमध्ये १६ गुण आणि ४४.४४ टक्के विजयाच्या सरासरीसह भारतीय संघ या यादीत पाचव्या स्थानी आहे.

गतविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ या यादीत सहाव्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचे गुण ३० असून विजयाची सरासरी ४१.६९ इतकी आहे. त्यानंतर वेस्टइंडीजचा संघ सातव्या स्थानी, इंग्लंडचा संघ आठव्या स्थानी आणि श्रीलंकेचा संघ नवव्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT